चांदा- कुकाणा रस्त्यावरील हॉटेल सह्याद्री वर सोनई पोलिसांचा छापा,अवैध दारू सह 63 हजारांचा मुद्देमाल जप्त

दत्तात्रय शिंदे
नेवासा तालुक्यातील सोनई पोलिसांनी सोमवार (दि. 30) रोजी चांदा- कुकाणा रस्त्यावरील हॉटेल सह्याद्री येथे छापा टाकून देशी।विदेशी कंपनीच्या 315 दारूच्या बाटल्या व रोख रक्कमेसह एकूण 63 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चांदा येथील हॉटेल सह्याद्री येथे बनावट दारू विक्री होत असल्याची माहिती सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाल्यावरून पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता 53 हजार 343 रुपये किंमतीच्या देशी व विदेशी कंपनीच्या एकूण 315 दारूच्या बाटल्या व 12 हजार 960 रुपये रोख असा एकूण 63 हजार 303 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
पो कॉ सचिन ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून रामेश्वर
भाऊसाहेब शेलार व शैलेश श्रीधर दहातोंडे (रा. चांदा ता.नेवासा) या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई),83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ रवींद्र लबडे करत आहेत.