आमदार डॉ किरण लहामटे यांचा घाटघर आश्रम शाळेत मुक्काम ,विद्यार्थ्यां सोबत घेतले भोजन!

अकोले प्रतिनिधी
अकोल्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी दुर्गम आदिवासी भागातील घाटघर येथील शासकीय आश्रम शाळेत मुक्काम ठोकला आणि ,विद्यार्थ्यां सोबत भोजनाचा आस्वाद घेतला

आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके साहेब यांच्या संकल्पनेतुन आदिवासी आश्रमशाळा व वस्तीगृहात “संवाद चिमुकल्यांशी” या अभियाना अंतर्गत घाटघर आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांना येणाऱ्या अडचणी समजुन घेतल्या,तेथिल सुविधांची पाहणी केली, त्यांच्या सोबत त्यांनी देण्यात येणाऱ्या भोजना चा आस्वाद घेतला आणि त्यांच्यासोबतच मुक्काम केला.

आश्रम शाळेच्या दर्जेदार इमारतींच्या सोबतच शासकीय आश्रम शाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपुर्ण होण्यासाठी प्रयत्न करून आश्रम शाळेबद्दल असलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

———