फिफ आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये नगरच्या मदार सिनेमाची निवड

अहमदनगर-कालपासून सुरु झालेल्या व दि ९ फेबु पर्यत चालणाऱ्या महाराष्ट्र शासन,एमटीडीसी व पुणे फिल्म फाऊंडेशन आयोजित ‘पुणेआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (Pune International Film Festival ) मध्ये नगरच्या मदार सिनेमाचा निवड झाली आहे
या स्पर्धेत मराठी मधील ७ चित्रपट निवडले गेले असून त्यामध्ये मदार हा एक आहे, दि ५ व ७ फेबु ल हा शो दाखवण्यात येणार आहे
या चित्रपटाचे निर्माते अभिनेते मिलिंद शिंदे,मनेश बदर,मच्छिंद्र धुमाळ आहेत तर कलाकार मिलिंद शिंदे,अमृता आगरवाल,आदिनाथ जाधव,अजिनाथ केवढे,भागाबाई दुधे,अनुजा कांबळे व इतर कलाकार आहेत 21 वा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या विद्यमाने 2 ते 9 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात 72 देशांतील 1574 एन्ट्री आल्या होत्या.त्यातील 140 सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स आणि लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहायल अशा तीन ठिकाणी एकूण नऊ पडद्यांवर सिनेमांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
मदार चित्रपटाचा सारांश असा आहे कि दुष्काळामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन कसे जळते, उन्हाळ्यात पाल तापल्यासारखी नाती तप्त होतात. मातीत ओलावा असेल तर माणसातही गोडवा असतो. सलग दोन वर्षे पाऊस न पडल्याने गावातील लोक जगण्याचा मार्ग शोधत आहेत, मात्र तो मार्ग कायमस्वरूपी नसल्याने लोक शहराकडे जाऊ लागले. ते नदीच्या काठावर राहू लागतात. गावातील लोकांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे आणि शेती पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे आणि कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. पाणी हे जीवन आहे तसेच पाणी नसेल तर जीवन अशक्य आहे. दुष्काळात अशा परिस्थितीत लोकांना धीर देण्याचे काम गावातील प्राध्यापक करत आहेत. आणि तो जमेल तितकी मदत करतो. बायकोचं दुःख आणि गावाचं दु:ख या दोहोंमध्ये प्राध्यापक स्वत:ला सावरतो आणि गावाला सावरतो. मदार चित्रपटाने हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला