ज्या क्षेत्रात जाल तेथे अग्रस्थानी रहा – हर्षदाताई काकडे

आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विद्यार्थ्यांना निरोप
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
बारावीनंतर भविष्यात ज्या क्षेत्रात जाल त्या ठिकाणी अग्र स्थानी राहा,आपल्या आई-वडिलांचे,शाळेचे तसेच संस्थेचे नाव उज्वल करा सकारात्मक ऊर्जा घेऊन अभ्यासपूर्णरित्या परीक्षेला सामोरे जा असे प्रतिपादन जि .प . सदस्या सौ .हर्षदाताई काकडे यांनी इयत्ता बारावी निरोप समारंभ प्रसंगी केले .
आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव या ठीकाणी इयत्ता बारावी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी सौ . हर्षदाताई काकडे या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या तसेच व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे, उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर, पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे ,ज्येष्ठ प्रा . सखाराम घावटे, प्रा . प्रतिमा उकिर्डे, संभाजी टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते .
सौ . हर्षदाताई काकडे आपले विचार व्यक्त करताना पुढे म्हणाल्या की, कनिष्ठ महाविद्यालयाने व संस्थेने सर्व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन वर्षभर विविध उपक्रम राबवले होते या सर्वांचा तुम्हाला निश्चितच भविष्यामध्ये फायदा होईल .आपली शैक्षणिक संस्था नेहमीच उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे काम करते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करून भविष्यात स्वतःवर विश्वास ठेवून उज्वल यश संपादन करावे असे सांगितले . इयत्ता बारावी प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षेसाठी व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी सौ . हर्षदाताई काकडे यांच्या वतीने इयत्ता बारावी प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांना लेखनि भेट देऊन त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या .
सदर कार्यक्रम प्रसंगी इयत्ता बारावीचे विद्यार्थी कु .शितल चौधरी ,कु .वैष्णवी टाक , काशिनाथ धावणे, क्षितिज जाधव, कोमल वखरे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत शिक्षकांप्रती व विद्यार्थ्यांप्रती ऋण व्यक्त केले .इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी कु . ज्ञानेश्वरी नरोटे हिने इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व बारावी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या .
शिक्षक प्रतिनिधी प्रा . सखाराम घावटे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, अभ्यासात सातत्य ठेवून आपले ध्येय साध्य करा .जीवनात दृढ संकल्प ठेऊन आव्हानांना सामोरे जावे तसेच जीवन जगत असताना राजहंसाप्रमाणे जीवन जगावे असा संदेश दिला .
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेसाठी व उज्वल भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या . विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाप्रती व शिक्षकांप्रती कृतज्ञेची भावना व्यक्त केली म्हणून विद्यार्थ्यांचे कौतुक केले .सर्व प्राध्यापकांनी सदैव तुमच्या हिताचा विचार करून तुम्हाला घडवण्याचे काम केले त्यामुळे भविष्यात या स्पर्धेच्या युगात ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी सदैव कनिष्ठ महाविद्यालयाची आठवण राहू द्या असे सांगितले .
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा .जरीना शेख यांनी केले . प्रा .सविता पवार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले .यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाकडून सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.