सहकार

संगमनेर तालुक्यातील अंभोरे सोसायटी निवडणूक बिनविरोध!

विखे आणि थोरात समर्थक गटाची सहमती एक्स्प्रेस

संगमनेर प्रतिनिधी
:संगमनेर तालुक्यात राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या अंभोरे विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळा ची निवडणूक  बिनविरोध पार पडली

संपतं गोविंद खेमनर, अनिल शिवराम खेमनर, ॲड संदिप जगनर यांच्या नेतृत्वाखालील विखे पाटील गट आणि सरपंच भास्कर खेमनर, आण्णासाहेब जगनर,ॲड शंकर खेमनर यांच्या नेतृत्वाखालील थोरात गट या दोन्हीगटाची सहमती एक्स्प्रेस धावल्याने अंभोरे सोसायटीची निवडनुक बिनविरोध पार पडली

, एकुण १३ जागेकरीता ४७ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज पात्र ठरले होते २० मे रोजी अर्ज माघारीची मुदत असल्याने थोरात, विखे गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांशी सुसंवाद साधून संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न केले
‘ त्यास शेवटी यश मिळाल्याने निवडणूक बिनविरोध झाली

सर्वसाधारण कर्जदार खातेदार मतदारसंघातुन शिवाजी गंगाधर खेमनर, दगडु भिमाजी खेमनर, बाबुराव सखाराम बाचकर, दगडु बिरु खेमनर, रावजी भागा खेमनर, शिवराम ठमाजी खेमनर, रमेश केरू खेमनर, सुर्यभान रावजी खेमनर तर इतर मागासवर्गीय मतदारसंघातुन सोपान नामदेव कोटकर, महिला राखीव मतदारसंघातून सईबाई भाऊसाहेब वाघमोडे, शांताबाई धोंडिबा पुणेकर, अनुसूचित जाती जमाती मधुन शिवाजी मारुती गवारी, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून वाल्मिक सोपान खेमनर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री खर्डे यांनी जाहीर केले .

संस्थेचे माजी चेअरमन राघुजी कडनर यांनी दोन्ही गटांचे आभार मानले , , गेली पाच वर्षांच्या कालावधीत संस्थेचा कारभार पारदर्शक राहिला आहे, सभासदांच्या व संस्थेच्या हितासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वसमावेशक काम केले आहे, संचालक मंडळ व सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कामकाज हताळण्यास खूप सहकार्य लाभले आहे. कोरोना च्या महामारीमुळे संस्थेचा कार्यकाळ वाढुन मिळाला, या काळातही संस्थेने स्वस्त धान्य दुकान ग्रामस्थांना वेळोवेळी धान्य वाटपाचे नियोजन उत्तम केले असे सांगत नूतन संचाल कांना त्यांनी शुभेच्या दिल्या


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button