तलवार बाळगणारे दोघे सोनई पोलिसांच्या जाळयात

दत्तात्रय शिंदे
दिनांक 30/10/2023 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चांदा येथे दोन इसम जवळ तलवार
बाळगुन गुन्हा करण्याचे बेतात असल्या बाबत खात्रीलायक बातमी मिळाल्याने सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस
निरीक्षक माणिक चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांना सदर ठिकाणी जावुन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले
सदर ठिकाणी जावुन बातमीतील नमुद इसमांना खात्री करून जागेवर पकडले असता त्यांचे जवळ दोन तलवारी मिळुन
आल्या. शकुर अकबर शेख वय 40 वर्ष संदीप गोविद जावळे वय-37 वर्षे दोघेही रा. चांदा ता. नेवासा . तलवारी बाबत
त्याचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरची तलवार त्यांचेच असल्याचे कबुल केले.
त्यावरुन सदर इसमावर कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करत असल्याचे सोनई पोलीस ठाण्याचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर
पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडमउपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि
माणिक चौधरी पो. हे. कॉ. मच्छिंद्र आडकित्ते पो. ना सोमनाथ झांबरे, पो. ना वजीर शेख, पो.कॉ विठ्ठल थोरात यांनी
केली.