जागरुक पालक तर सुदृढ बालक ,अभियानाचा समशेरपुर ग्रामीण रुग्णालयात शुभारंभ

शांताराम दराडे
समशेरपुर/प्रतिनिधी..
महाराष्ट्राच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे प्रेरणेने संपूर्ण राज्यात आज 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर तसेच ग्रामीण रुग्णालय समशेरपुर यांचे संयुक्त विद्यमाने जागरुक पालक तर सुदृढ बालक या अभियानाचा शुभारंभ तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय समशेपुर येथे करण्यात आले
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, जिल्हा परिषद सदस्य सुश्मा दराडे तसेच वैद्यकीय अधिकारी राज घोडके आदी उपस्थित होते ग्रामीण तसेच शहरी भागातील शून्य ते अठरा वयोगटातील लहान बालकांना जे विविध प्रकारचे आजार आहेत त्यात फुप्फुसाचे आजार, हृदयाचे आजार, किडनीचे आजार, शारीरिक व्यंग तसेच अनेक प्रकारचे आजार होतात आणि ज्या आजारांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे असे विविध आजार या सर्व आजारांवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येणार आहे
18 वर्षाखालील समशेरपुर येथील सतराशे विद्यार्थ्यांची यादी शासनास प्राप्त झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वतीने देण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जन्मदिनी सुरू होत असलेला हा उपक्रम 18 वर्षाखालील मुला मुलींसाठी निश्चितच लाभदायक ठरणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, तसेच शासनाचे वतीने आयोजित महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .
वैद्यकीय अधीक्षक राज घोडके यांनी जागरुक पालक तर सुदृढ बालक या अभियाना संदर्भात माहिती दिली त्यांनी सांगितले की, येत्या दोन महिन्यात संपूर्ण परिसरातील अठरा वर्षे वयाच्या आतील सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना शासनाच्या वतीने मोफत वैद्यकीय उपचार देणार असल्याची माहिती दिली या कार्यक्रमा वेळी वैद्यकीय अधिकारी राहुल कवडे, टाहाकारीचे माजी सरपंच बादशहा एखंडे, संदीप दराडे, संतोष मंडलीक, फिरोज शेख, अमोल दराडे, कचरू नाना दराडे, दत्तू चौधरी, जनाबाई साळवे, संजय गोरे, लहानू भरीतकर, मार्तंड कदम, सुदाम कदम, राहुल मुखेकर,स्टाफ च्या वतीने भडांगे, दिवटे, इनामदार तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते