महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचा पुणे विभाग मेळावा संपन्न

पुणे प्रतिनिधी
कामगारांच्या न्याय हक्कांच्या मागण्या करिता कामगारांनी एकजुटीने संघटने सोबत रहावे आपला विजय नक्कीच होईल असे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष श्री नीलेश खरात यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले.
या वेळी मागील काळात महत्वपूर्ण योगदान घडामोडी मध्ये महाराष्ट्र राज्य तील 7500 कामगारांना कोर्टाच्या माध्यमातून रोजगारात संरक्षण, संघटनेचे कल्याणकारी योजना, बेबसाईट , आंदोलन ई महत्वपूर्ण उपलब्धी नमूद केली.
भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्त वीज कंत्राटी कामगारांचा मेळावा बुधवार दिंनाक 8 फेब्रुवारी रोजी सौदामिनी सभागृह मंगळवार पेठ पुणे येथे संपन्न झाला या मेळाव्यात पुणे शहर व सर्व तालुक्यातील 400 कामगार उपस्थित होते.

या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी महावितरण कंपनी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता मा. राजेंद्र पवार उपमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी मा. शिरीष काटकर तसेच सहाय्यक कामगार आयुक्त मा डी डी पवार उपस्थित होते .
संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहुल बोडके, संघटनमंत्री उमेश आनेराव, कोशाध्यक्ष सागर पवार, भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष मा. अर्जुन चव्हाण , उमेश विस्वाद, महिला प्रमुख वंदना कामठे, आणि पुणे झोन अध्यक्ष सुमित कांबळे, सचिव निखिल टेकवडे पुर्व अध्यक्ष शरद संत , कामगार महासंघाचे तुकाराम डिंबळे उपस्थित होते.

राज्याचे ऊर्जामंत्री यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर 4 जानेवारी 2023 रोजी कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचा सूचक इशारा दिला आहे . कामगारांनी प्रामाणिकपणे जनतेला वीज सेवा पुरवून वीज बिलाचा महसूल गोळा करावा व उत्तम सेवा देऊन महावितरण चे नाव लौकीक वाढवावे तसेच सुरक्षा कार्यप्रणाली नुसार काम करावे असे प्रतिपादन मुख्य अभियंता मा श्री राजेंद्र पवार यांनी केले आहे.
कामगार विभाग हा सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून पुणे जिल्हा कामगार आयुक्त कार्यालयातून या कामगारांना अनेकदा न्याय दिल्याचे दाखले सहाय्यक कामगार आयुक्त मा डी डी पवार यांनी दिले. तसेच कंत्राटदार कंपनी व प्रशासन यांनीही कंत्राटी कामगारांना 10 ता पुर्वी संपुर्ण वेतन, महागाई भत्ता, व कामगार कायद्यातील तरतूदी चे पालन बाबतीत अंमलबजावणी करावी. असे प्रतिपादन केले आहे.

कामगार संघटना व वीज कंपनी प्रशासनात चांगला सुसंवाद असल्याने पुण्यात कंत्राटी कामगारांना फारश्या समस्या नसल्याचे उपमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी मा. शिरीष काटकर यांनी सांगितले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सरचिटणीस सचिन मेंगाळे व आभार प्रदर्शन सुमीत यांनी केले आहे.