माजी आमदार नंदकुमार झावरे विद्यापीठाच्या जीवन साधना गौरव पुरस्काराचे मानकरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा जीवन साधना गौरव पुरस्कार यंदा अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दिनांक 10 फेब्रुवारीला विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. माजी आमदार नंदकुमार झावरे यांची राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील साधना पन्नास वर्षापेक्षा अधिक काळातील आहे. त्याचाच हा बहुमान मानावा लागेल. त्यांच्या अधिपत्याखाली जिल्हा मराठा विद्या प्रसारक ही जिल्ह्यातील सर्वात मोठी शैक्षणिक शिक्षण संस्था आहे.या शिक्षण संस्थेच्या नावात मराठा उल्लेख असला तरी ती सर्व जाती धर्मासाठी खुली असते. या संस्थेचे ते गेली अनेक वर्षे अध्यक्ष आहेत. जिल्हा मराठा विद्या प्रसारकाचा अहमदनगर जिल्ह्यात विस्तार झालेला आहे.या संस्थेचे नेतृत्व यापूर्वी भापकर साहेब,म्हस्के साहेब , आठरे साहेब , वाघ साहेब ,मुळे साहेब आदींनी केले तसे आता या शिक्षण संस्थेच्या नेतृत्वाची जबाबदारी अध्यक्ष म्हणून नंदकुमार झावरे यांच्याकडे आहे ही संस्था ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा पुरवीत असल्यामुळे काही मर्यादा जरूर येतात पण त्यावर मात करून नंदकुमार झावरे यांनी या शिक्षण संस्थेचा चेहरा मोहरा गेल्या दहा वर्षात बदलला सामूहिक प्रयत्नांचे यश असले तरी अध्यक्ष म्हणून या श्रेयाचे मानकरी माजी आमदार नंदकुमार झावरे हेच ठरतात. या शैक्षणिक संस्थेतील माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही म्हणूनच पुणे विद्यापीठाने त्यांचा जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष म्हणून नंदकुमार झावरे यांना मिळाला असल्या तरी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेची शंभर वर्षाची तपश्चर्या त्यामागे आहे.या शिक्षण संस्थेने कालपरत्वे
शैक्षणिक बदल करून शैक्षणिक स्पर्धेत टिकून आहे.पुणे,, मुंबईतील जुन्या शिक्षण संस्था कालबाह्य ठरल्या असल्या तरी सुद्धा जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था तग धरून आहे. किंबहुना स्पर्धेशी सामना करून पुढे जात आहे. दरवर्षी या संस्थेचे विद्यार्थी विद्यापीठात चमकतात. पुणे विद्यापीठात यश टिकून ठेवणे इतके सोपे नसते पण ती शैक्षणिक किमया संस्थेचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे. त्याचाच हा पुरस्कार बहुमान आहे असे म्हटले तरी ते आतिशयोक्तीचे ठरु नये. ज्या शिक्षण संस्थेचे नेतृत्व करतात ती शिक्षण संस्था खाजगी नसून सार्वजनिक आहे. सार्वजनिक शैक्षणिक संस्थेचे नेतृत्व करणे ही इतकी सोपी आणि सरळ बाब नाही. माजी आमदार नंदकुमार झावरे त्या निकषावर खरे उतरल्यानेच त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील साधनेचा गौरव झाला. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात किती तरी दिग्गज शिक्षण सम्राट आहेत त्यांच्या ऐवजी माजी आमदार नंदकुमार झावरे यांना पुरस्कार मिळतो हीच त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची पोचपावती आहे. त्यांच्या शैक्षणिक साधनाचा विद्यापीठाने गौरव करण्याचे ठरवले हा त्यांच्या शैक्षणिक साधनेचा खऱ्या अर्थाने मिळालेल्या नैसर्गिक न्याय मानावा लागेल.
शब्दांकन —
चंद्रकांत शिरोळे
( प्राचार्य, अनुदानित आश्रम शाळा,सारोळे पठार)