इतर

कोतुळ पुलाचे काम  30 मे 2023 अखेर पूर्ण करू -ठाकरे

तर मी स्वतः उपोषणास बसणार-

आमदार किरण लहामटे!

कोतुळ प्रतिनिधी

 सुमारे 20 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या  मुळा नदीवरील कोतुळ  येथील  नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात  असून उर्वरित काम 30 मे 2023 अखेर पूर्ण करू असे आश्वासन  ऊर्ध्व प्रवरा  कालवा विभाग संगमनेर चे  कार्यकारी अभियंता के एच ठाकरे  यांनी दिले

 अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे  यांच्या उपस्थितीत कोतूळ  येथे  कोतुळ पूल कृती समिती सदस्य , ग्रामस्थ तसेच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक आज पार पडली या बैठकीत त्यांनी ही  माहिती दिली 

कोतुळ  येथील सुरू असलेल्या पुलाचे काम गेले काही दिवसांपासून रेंगाळले  आहे याबाबत  ग्रामस्थांनी आमदार किरण लहामटे  यांच्याकडे नाराजी  व्यक्त केली होती यावरून  आमदार डॉक्टर लहामटे  यांनी अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक लावली यावेळी त्यांनी  ग्रामस्थांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कंत्राटदाराला  सक्त ताकीद दिली कामाची मुदत जून 2023  अखेर असली तरी मे 2023 पर्यंत काम पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदार यांना दिल्या 

यावेळी या  विभागाचे कार्यकारी अभियंता के एच ठाकरे उपविभागीय अभियंता ए के आंधळे ,शाखा अभियंता वाय एम खडके , ग्रामपंचायतचे सरपंच भास्कर लोहकरे, पूल कृती समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख,ग्रा प  सदस्य बबलू देशमुख ,ग्रामविकास अधिकारी श्री  सुभाष जाधव ग्रामस्थ व पुल कृती  समितीचे  सदस्य उपस्थित होते

पुलाचे काम  प्रगतील आहे,  कामाची मुदत 30 जून 2023 पर्यंत आहे तथापि  काम मुदतीपूर्व 30 मे 2023पर्यंत पूर्ण करू असे लेखी आस्वासन कंत्रादारचे प्रोजेक्ट् मॅनेजर जयसिंग गवळी यांनी यावेळी दिले

 

 पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी  आठ  दिवसात  सर्व मशिनरी व यंत्रणा कामाच्या ठिकाणी  सतर्क करा  पावसाळ्या पूर्वी काम  पूर्ण करण्याचे  नियोजन करा अन्यथा मीच  उपोषणाला  बसेल  असे आमदार लहामटे यांनी यावेळी सांगितले 

———

यावेळी चंद्रकांत घाटकर ,रवींद्र आरोटे, सचिन गीते फारुख  पठाण ,ग्रामपंचायत सदस्य शंकर घोलप, भरत देशमाने  बाळासाहेब देशमुख  आदींनी  पुलाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात कुठलीही दिरंगाई सहन केली जाणार नाही  असे सांगत अनेक वर्ष आम्ही या कामासाठी लढा दिला दळणवळण चा  त्रास सहन केला आता कुठलीही दिरंगाई सहन केली जाणार नाही  कामाची गती वाढवून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे अन्यथा   तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button