बी.एस.एन.एल. मधील निवृत्तीवेतन धारकांना मिळणार 15 % वाढ. दूरसंचार मंत्र्यांचे भामसंघ च्या शिष्टमंडळ ला आस्वासन.

पुणे- बी एस एन एल मधील निवृत्ती वेतन नाच्या वाढी बाबतीत भारतीय दूरसंचार पेन्शर्स संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) चा पाठपुरावा चालू होता, या पार्श्वभूमीवर ना श्री अश्विनी वैप्णव दूरसंचार मंत्री भारत सरकार यांच्या समावेत संघाच्या शिष्टमंडळशी नवी दिल्ली येथे चर्चा झाली
यावेळी भारतातील बी एस एन एल मधील निवृत्त सुमारे 3 लाख कामगारां करिता निवृत्ती वेतना मध्ये सुमारे 15% वाढ करण्याचे आस्वासन मा मंत्री महोदय यांनी केली आहे. बी डी पी एस ( संलग्न भारतीय मजदूर संघ )च्या शिष्टमंडळात महामंत्री श्री हरी सोवनी, धरमराज सिंग एम टी एन एल मजदूर संघ महामंत्री, आर सी पांडे महामंत्री बी टी ई यु (बी एस एन एल) व्ही व्ही सत्यनारायणा अध्यक्ष बी टी ई यु ( बी एस एन एल) गिरीश आर्या सेक्रेटरी भामसंघ हे उपस्थित होते.
या वेळी ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्नांबाबतीत चर्चा करून कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
भारतीय दूरसंचार पेन्शर्स संघाची स्थापना 2020 मध्ये झाली तेंव्हा पासून बी एस एन एल मधील निवृत्ती वेतन केंद्र सरकारी कामगारां प्रमाणे होण्याकरिता सातत्याने पाठपुरावा केला होता. संघटने सर्व प्रथम ही मागणी ऑक्टोबर 2020 मध्ये मा गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे केली होती.