वीज दरवाढ रोखण्यासाठी सामूहिकपणे
लढा देण्यासाठी रविवारी चर्चासत्र..

.
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचा
पुढाकार
सोलापूर : दोन वर्षांपूर्वी आलेल्या जीवघेण्या कोरोनापासून सावरत आर्थिक घडी बसवताना सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंब आणि छोट्या – मोठ्या व्यावसायिकांची धडपड चालू आहे. अशातच महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाकडे दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे. जर वीज दरवाढ झाले तर, सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासह अनेक व्यावसायिकांची कंबरडे मोडले जाणार आहे. म्हणून यासाठी सोलापूरातील सामान्य कुटुंबातील कर्ता आणि छोटे – मोठे व्यावसायिकांनी रविवार, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता पूर्व भागातील श्रीराम मंदिर येथे आयोजित केले असून या चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी दिले आहे.
महावितरणने तब्बल ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव दिले आहे. प्रस्ताव मंजूर झाले तर ग्राहकांना युनिटमागे २.०९ रुपयांचा भूर्दंड बसणार आहे. यामुळे आर्थिक घडी विस्कटले जाईल. आक्षेप आणि हरकती मांडण्याचा अंतीम तारीख १५ फेब्रुवारी असून विषयाचे गांभीर्य ओळखून श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित रविवारी सायंकाळी होणा-या चर्चेत सोलापूरातील मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुख, व्यावसायिक, व्यापारी आणि वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावेत, तसेच अधिक माहितीसाठी (श्री. दयानंद कोंडाबत्तीनी +91 93704 28583) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, सल्लागार सुकुमार सिध्दम काका, श्रीराम मंदिराचे विश्वस्त दयानंद कोंडाबत्तीनी, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामुर्ती, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, अंबादास गुर्रम, मधुसूदन माचरला, बालाजी कुंटला, नवनीत पोला यांनी केले आहे.