
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक कार्यक्रम सुरू असुन उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 13 जागेसाठी 26 उमेदवारांचे अर्ज राहिल्याने हि निवडणूक दुरंगी लढत होत आहे.
आमदार डॅा.किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, कॅाग्रेस, शिवसेना, आरपीआय,याच्या महाविकास आघाडीचे शेतकरी समृद्धी मंडळाचे 13 उमेदवार दिले असुन भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे नेतृत्वाखाली व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाने 13 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
lया निवडणूकीत 13 जागेसाठी 26 उमेदवार असुन समोरासमोर दुरंगी लढत होत आहे येत्या 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यत मतदान होणार असुन त्यानंतर 5 वा मतमोजणी होणार आहे.
खरेदी विक्रीच्या निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा आजी- माजी आमदार यांच्या मंडळांत चुरशीची लढत होणार आहे.
या निवडणुकीतील पॅनल नुसार उमेदवार पुढीलप्रमाणे
शेतकरी विकास मंडळ —
सोसायटी मतदार संघ –
1) कासार भाऊसाहेब कारभारी, 2) अस्वले किसन शिवाजी 3) देशमुख सोपान तुकाराम, 4) धुमाळ गंगाराम पुंजा 5) नाईकवाडी नानासाहेब मारुती 6)नवले प्रदिप भास्कर
व्यक्तिगत मतदार संघ —
1) गायकर भानुदास नाना 2) देशमुख विकास बाळासाहेब
महिला मतदार संघ –
1) शिंदे अनुप्रिता विराज,2) वैद्य कलावती सुर्यभान
भटक्या जाती जमाती –1) बेनके पंढरीनाथ सखाराम,
अनुसूचीत जाती जमाती –1)आढार रामा सखाराम
इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) – घोडसरे संपत म्हतारबा
शेतकरी समृद्धी मंडळ
सोसायटी मतदार संघातून
1) दत्ताञय कोटकर(राष्ट्रवादी) , 2) त्र्यंबक आवारी (राष्ट्रवादी)3)निलेश तळेकर,(राष्ट्रवादी) 4) प्रकाश नाईकवाडी (राष्ट्रवादी)5) अरुण फापाळे(राष्ट्रवादी) 6)साईनाथ नवले, (कॅाग्रेस)
व्यक्तिगत मतदार संघ –1) विठ्ठल कुमकर (राष्ट्रवादी) 2) दगडु डोंगरे (राष्ट्रवादी )
इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) – माधवराव तिटमे (शिवसेना)
भ.वि.जा.ज — मधुकरराव बिन्नर (राष्ट्रवादी)
महिला राखीव — 1) कुमोदीनी पोखरकर (राष्ट्रवादी) 2)मंदाकिनी नाईकवाडी (शिवसेना)
अनुसूचीत जाती जमाती –चंदर बांडे ( राष्ट्रवादी)
————-