कौशल्यधिष्ठीत शिक्षण काळाची गरज – डॉ.प्रमोद पाब्रेकर

विलास तुपे
राजूर /प्रीतिनिधी
जागतिक पातळीवर विविध देशांमध्ये आज शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे. शिक्षण आणि उद्योगाची सांगड घालून रोजगार निर्मिती करणे काळाची गरज आहे. पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन व्यावसायिक शिक्षण देणे याकडे शिक्षण संस्थांनी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या उद्देशानेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० उपयुक्त ठरणार आहे.असे प्रतिपादन डॉ.प्रमोद पाब्रेकर ( सीनियर कन्सल्टंट राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) यांनी केले ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि अँड.एम.एन.देशमुख महाविद्यालय राजूर, महाविद्यालयातील विज्ञान विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने ” राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची अंमलबजावणी ” या अंतर्गत” जैवविविधतेतील अलीकडील बदल” या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. रमेश भारमल (माजी अधिष्ठाता नायर हॉस्पिटल मुंबई) हे उपस्थित होते. याप्रसंगी टी.एन.कानवडे( सचिव सत्यनिकेतन संस्था राजुर) हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी करून महाविद्यालयात चालू असलेल्या उपक्रमांविषयीची सविस्तर माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.भारमल म्हणाले की,
” राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील गुणवत्ता वाढविण्यासाठी पोषक ठरणार असल्याने सर्व स्तरावर या धोरणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे ” या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी गुजरात, दिल्ली, इंदोर, कर्नाटक, हैदराबाद इ ठिकाणाहून प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

तर साधन व्यक्ती म्हणून डॉ. रावल (बडोदा), डॉ विजय कानवडे(हैदराबाद), डॉ प्रमोद पाब्रेकर ( मुंबई), डॉ हिवरे( औरंगाबाद), डॉ. घाने, डॉ आघाव ( पनवेल) आदि मान्यवर उपस्थित होते. या सर्व साधन व्यक्तींनी ” रिसेंट ट्रेंड इन बायो डायव्हर्सिटी” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.या राष्ट्रीय कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्रा.रोहित मुठे यांनी केले तर समन्वयक डॉ.सौ.दीपमाला तांबे यांनी प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला. तर
सहसमन्वयक डॉ.व्ही.एन. गिते यांनी आभार प्रदर्शन केले. या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालय व विद्यापीठातून एकूण १२५ प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. ही राष्ट्रीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. कासार, प्रा.अवसरकर, प्रा.डॉ. टपले, प्रा.एस.के.थोरात, प्रा. शिंदे, प्रा. एस.वाय. हांडे प्रा.पवार मॅडम, वाकचौरे मॅडम, प्रा धिंदळे मॅडम, व विज्ञान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.