नगर येथे गुरू दत्त भक्तिधाम” मंदिर वर्धापन दिना निमित्त भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा!

दत्ता ठुबे
अहमदनगर -येथील “गुरू दत्त भक्तिधाम” येथे मंदिराच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त 17एप्रिल ते 23 एप्रिल रोजी श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला आहे
नगर-“गुरू दत्त भक्तिधाम”संत किसनगिरीनगर, भिस्तबाग, पाईपलाईन रोड,अ.नगर येथे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा नगर भक्त मंडळाचे वतीने ‘गुरु दत्त भक्तिधाम’ मंदिराच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.श्री.समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपेने प.पू. प्रातःस्मरणीय गुरूवर्य ह.भ.प.श्री.भास्करगिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड यांच्या प्रेरणेने ह.भ.प. स्वामी श्री. प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या मधुरवाणीतून श्रीमद् भागवत कथा आयोजित करण्यात आलेली आहे.तरी आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.गुरू दत्त भक्तिधाम मंदिरासमोर प.पू.गुरूवर्य श्री. बाबाजींच्या कल्पनेतून सुंदर महाद्वार बांधण्यात आले आहे. त्याचा अर्पण सोहळा प.पू. ह.भ.प.गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते सोमवार दि. १७/०४/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे.सदर महाद्वाराचे संपूर्ण काम राजेंद्र शेडाळे व पवनकुमार घिगे व मंदिराचे रंगकाम सुखदेव शेडाळे कार्या.अधिक्षक (सेवानिवृत्त) जि.प. अ. नगर यांनी केले आहे.
श्रीमद् भागवत कथा सोमवार दि. १७/०४/२०२३ ते शनिवार दि. २२/०४/२०२३ रोजी सायं ५.०० ते ८.०० आणि रविवार दि. २३/४/२०२३ रोजी सकाळी ८ ते ११ त्यानंतर प. पू. गुरुवर्य श्री. भास्करगिरीजी महाराज व उपस्थित संतांचे शुभाशिर्वाद व यानंतर भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.