इतर

संधीचा उपयोग लोकांसाठी केला : सभापती काशिनाथ दाते सर

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी

जिल्हा वार्षिक योजना लेखाशिर्ष ३०५४ अंतर्गत राममा-२२२ ते काळेझाप रस्ता (ग्रामा-१५८) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – ३० लक्ष, शिंदे पेठ ते वरची शिंदे पेठ सी.डी. वर्क करणे – २५ लक्ष अशा ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले होते. शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियंकाताई खिलारी, उपतालुकाप्रमुख पंढरीनाथ उंडे, युवा सेना उपतालुका प्रमुख शुभम टेकुडे, विभाग प्रमुख देवराम मगर, शेतकरी सेना प्रमुख कैलास न-हे, उपतालुकाप्रमुख सुभाष सासवडे, महिला उप तालुका प्रमुख सुनिता मुळे प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले कर्जुले हर्या गावात पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात कामे करता आले याचे श्रेय तुम्हालाही आहे. कारण तुम्ही मला भरभरून मतदान केले मताधिक्य दिले आणि सभापतीपदापर्यंत जाता आले त्याची उपकाराची जाणीव म्हणून संपूर्ण गटामध्ये आपण सगळ्या गावांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम केले. माझ्या गावानंतर या गावावर माझे विशेष प्रेम आहे कारण माझ्या जीवनाची वाटचाल येथून झाली. पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण मी या गावात शिकलो मी माझ्या परिसराचा संपर्क कधी कमी होऊ दिला नाही, सातत्याने संपर्कात राहिलो माझ्या परिसरातील लोकांच्या सुखदुःखात मी कायम राहिलो. माजी आमदार विजय औटी यांनी तालुक्यात जी विकास कामांची सुरुवात केली तोच रथ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शिंदे पेठ च्या ओढ्यातून जाताना पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. पाण्यातून जाताना बऱ्याच वेळा मोटरसायकल घसरून पाण्यात पडले जायचे. महिला, मुलांना येथुन जाताना अतिशय बिकट परिस्थिती होती त्या रस्त्यावर सी.डीवर्क करण्यासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी दिला त्याची सुरुवात ही आज झाली. संधी मिळाल्यानंतर अनेक गावात काम करण्याचा प्रयत्न केला. सर्वांचा विकास करण्याचा प्रयत्न केला ग्रामीण भागात पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला. राहिलेली ही कामे मार्गी लावून देईल काळजी करू नका. तुम्ही आम्हाला बोलावले आमचा मान सन्मान केला तुमचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो. पंढरीनाथ उंडे म्हणाले काळेझाप वस्तीला रस्ता देण्याच्या आश्वासन यापूर्वी दिले होते, परंतु दोन वर्षे झाले तरी रस्ता नाही शेवटी दाते सरांनी रस्त्याला निधी दिला, हा रस्ता खिंडीपर्यंत नेण्याचे काम सरांनाच करावे लागेल अशी ग्रामस्थांच्या अपेक्षा आहे गावात आठ ते दहा कोटी रुपयांची कामे सरांनी केली आहे.प्रियंका खिलारी, सुभाष सासवडे, माजी सरपंच साहेबराव दादा वाफारे, सरपंच संजीवनी आंधळे, एकनाथ दाते सर, अशोक जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले.

: पावसाळ्यात छत्र्या उगवतात तशा निवडणुकीत छत्र्या उगवतात, पाण्याचे नियोजन करण्यासाठी दुर्बिणी लावल्या जाणार, तालुक्यात गाजर दाखवणारे आहेत, गाजर हलव्यांपासून दूर राहा! लोकांना वेड्यात काढण्याचे काम चालू आहे, ज्यांच्याकडे काहीच नाही ते गाजर दाखवतात, दाते सरांना लोक काम सांगतात, कारण ते सांगितलेले कामे करून देतात, त्यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली :

रामदास भोसले

शिवसेना जिल्हा उपप्रमुख.

यावेळी उपसरपंच मिनीनाथ शिर्के, आनंदा शिर्के, रामदास आंधळे, मेजर दाते, लक्ष्मण दाते, माऊली शिंदे, बाळासाहेब शिंदे, रंगनाथ आंधळे, नितीन आंधळे, जैनुद्दीन भाई,योगिता जाधव, पुष्पा जाधव, हिराबाई काळे, सुमन काळे, प्राजक्ता जाधव, मंगल कोकाटे, सुभद्रा आंधळे, वंदना काळे, अलका काळे, मनीषा काळे, अंजना आंधळे, सखुबाई काळे, पार्वती रोकडे, अरुणा आंधळे, ताराबाई जाधव, गंगुबाई आंधळे, झुंबराबाई शिंदे, भिमाजी दाते, भानुदास आंधळे, सुखदेव आंधळे, राजू दाते, मारुती दाते, कारभारी काळे, निवृत्ती आंधळे, शिवाजी दाते, साहेबराव काळे, महेश आग्रे, दादाभाऊ आंधळे, दत्तात्रय आंधळे, हरिभाऊ आंधळे, शिवाजी काळे सर, महादेव आंधळे, प्रकाश आंधळे, विकास काळे, दत्तू काळे, किसन आंधळे, शांताराम आंधळे, ज्ञानदेव शिंदे, पांडुरंग घनदाट, आनंद आंधळे, तानाजी आंधळे, भाऊसाहेब आंधळे, यशवंत दाते, शब्बीर पठाण, अशोक कोकाटे, हरिदास आंधळे, सागर जाधव, अमोल आंधळे, दिलीप कोकाटे इत्यादी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आंधळे गुरुजी यांनी केले तर सर्वांचे आभार पंढरीनाथ उंडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button