अल्पवयीन मुलीस पळून नेणाऱ्या आरोपीस केले गजाआड!

दत्तात्रय शिंदे
एका अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणास पोलिसांनी नगर एमआयडीसी येथे शिताफीने पकडले. या
आरोपीने डांबून ठेवलेल्या या अपहृत तरुणीसही
पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवार दि. ०७
फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी ०८.३० वाजता
श्रीरामपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीस
अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले.
याप्रकरणी तिच्या आईने देलेल्या फिर्यादी वरून
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम
३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर अपहृत मुलीचा व आरोपी याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील तपासी अधिकाऱ्यांना आदेश दिल्याने त्यानुसार चक्रे फिरवत तपास पथकाने गोपनीय
बातमीदारामार्फत बातमी मिळवली की सदर अपहृत मुलगी गायब झाली त्याचवेळी परिसरातच राहणारा सराईत आरोपी मोसीन जावेद शेख (वय २८) देखील सदर गुन्हा घडले पासून पसार झाला. आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याचा शोध घेतला असता तो नगर एम. आय. डी. सी मध्ये असल्याची
माहिती मिळाली.
तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी नगर एमआयडीसी मध्ये सापळा रचुन शिताफतीने सदर आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे अपहृत मुलीबाबत चौकशी केली असता त्याने सदर मुलगी हिचे अपहरण केल्याची कबुली देवुन तिला एका
खोलीत ठेवल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच पोलिस पथकाने तेथे जावून सदर मुलीस ताब्यात घेतले. व तिला फिर्यादी आईच्या ताब्यात देण्यातआले. तर आरोपी मोसीन जावेद शेख (वय २८) याच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक
हर्षवर्धन गवळी यांच्या आदेशाने पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एम. पाटील,पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गाडेकर, पोलीस नाईक अढागळे, पोलीस नाईक रघुवीर कारखीले पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल रमिझराजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे,
पोलीस कॉन्स्टेबल गौरव दुर्गुळे, पोलीस कॉन्स्टेबल क्षिरसागर, पोलीस कॉन्स्टेबल दरेकर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पोलीस नाईक फुरकान शेख व प्रमोद जाधव यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.
एम. पाटील हे करीत आहेत.