ऊर्जामंत्री .ना.देवेंद्र फडणवीसांच्या घरावर आज वीज कामगारांचा मोर्चा

:
नागपूर-भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतनवाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यासाठी उद्या शनिवार दि.24 ऑगस्ट रोजी राज्यभरातून सर्व वीज कंत्राटी कामगार एकत्र येऊन रेशीमबाग मैदान पासून ते ऊर्जामंत्री यांच्या निवासस्थाना पर्यंत पायी मोर्चा काढणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मा.अवर मुख्य सचिव (ऊर्जा)मा.आभा शुक्ला यांनी संघाच्या प्रतिनिधीची मंगळवार दि. 20 ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक घेतली मात्र कामगार हितार्थ ठोस व सकारात्मक असे कोणतेही आश्वासन या बैठकीत न मिळाल्याने संघटना नागपूर आंदोलनावर ठाम राहिली.
राज्याचे ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीच संघटने सोबत सकारात्मक चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, या कष्टकरी कामगारांना वेतन वाढ व हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा व फडणवीस साहेबच या कामगारांना योग्य न्याय देऊ शकतात हा विश्वास भारतीय मजदूर संघाला आहे, साहेबांनी न्याय देई पर्यंत संघटना बेमुदत आमरण उपोषण आंदोलन थांबवणार नाही असे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश महामंत्री मा.गजानन गटलेवार, महाराष्ट्र प्रदेशाचे प्रसिद्धी प्रमुख सागर पवार, वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे, उमेश आनेराव, राहुल बोडके, केंद्रीय सचिव अभिजित माहुलकर पदाधिकारी उपस्थित होते