इतर

राजकीय सुडातून विरोध होत असेल तर रुग्णालयाचे अन्यत्र स्थलांतर ! आमदार निलेश लंके

विरोध करणाऱ्यांचे देवस्थानच्याच जागेत,

अवैध धंदे व बंगले मग

रुग्णालयासाठी यांचा विरोध का ?

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :


पारनेर शहरात १ हजार १०० कोटी रुपयांचा हे अद्यावत रुग्णालय उभारण्याचा मानस माझा होता परंतु या सामाजिक व विधायक उपक्रमाला विरोध व राजकारण होत असेल तर पारनेर शहर सोडून इतर ठिकाणी हे अद्यावत रुग्णालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले

.समाजासाठी विधायक व एवढ्या चांगल्या उपक्रमाला जर विरोध करत असतील तर ही अद्यावत रुग्णालय अन्यत्र हलवणार असल्याचे आमदार निलेश लंकेनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष विजय औटी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात जवळपास ३५ ते ३६ हजार रुग्णांना खडखडीत बरे केले असून दिवसभरात किमान दहा तरी रुग्ण माझ्याकडे उपचार साठी येत असतात . त्यामुळे उपचारासाठी नगर पुण्याला जाण्याऐवजी जर पारनेर शहरात अद्यावत रुग्णालय उभारले तर आपल्या जनतेची सोय होईल.या उदात्त हेतूने रुग्णालय उभारणाराचा
मतदार संघातील लोकांचे आरोग्य व शिक्षण बेरोजगारी यांना प्राधान्य देणार असुन या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत रात्री अपरात्री लोकांना मदतीचा हात देण्यासाठी ही अद्यावत रुग्णालय उभारण्यात आले आहे.कोरोना काळात अनेक लोकांना मदतीचा हात दिला आहे अनेकदा रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी मदत केली आहे.आरोग्याशी माझा जवळचा संबंध आला असून गोरगरीब व गरजू लोकांसाठी अद्यावत रुग्णालया उभारण्याचा मानस मी केला असून त्यादृष्टीने पारनेर येथे प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे काम सुरू करणार आहे.
चांगले काम व प्रामाणिकपणे समाजासाठी काम करतो परंतु पारनेरचा पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे अद्यावत रुग्णालयामुळे पारनेरचा चेहरा मोहरा बदलणार आहे अनेक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे .१२ पैकी २ लोक गैरहजर होते त्यामुळे या रुग्णालयाच्या उभारणीसाठी १० नगरसेवक बरोबर आहे त्यामुळे नगराध्यक्ष विजय औटी व इतर नगरसेवकांशी याबाबत चर्चा करून निर्णय घेतला आहे.ज्या शहरात एवढा चांगला सामाजिक उपक्रमाला विरोध होत असेल तर दुसरीकडे हे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.


टाकळी ढोकेश्वर व‌ परिसरातील व दुर्गम भागातील व नगर तालुक्यातील अनेक गावांसाठी अद्यावत ५०० बेडचे रूग्णालय उभारणीसचा मानस आहे.सर्व शासकीय योजनांचा लाभ या रुग्णालयाच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.या रुग्णालयाच्या माध्यमातून उपचाराबरोबर रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे . पारनेर नगरपंचायतीच्या गट नंबर ९६ मधील शासकीय भूखंडावर हा अद्यावत ५०० बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार होते परंतु राजकीय स्वार्थापोटी विरोध करत असल्याने अन्यत्र हलवणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.


देवस्थानच्या जागेत अवैंध धंदे करण्यारांचे समाजासाठी योगदान काय आमदार निलेश लंके
पारनेर गावातील देवस्थानच्या जागेमध्ये अनेकांनी आपले हॉटेल व्यवसाय दारूचे धंदे तालीम सुरू करून त्यांनी समाजासाठी कधी दोन रुपया खर्च केला नाही अथवा त्यांच्या समाजासाठी कोणत्याही प्रकारची योगदान नाही.देवस्थानच्या जागेत हाॅटेल दारूधंदे व तालिम असताना त्यामुळे काळे धंदे करणारा समाजासाठी शुन्य टक्के योगदान आहे त्यामुळे चांगल्या काम करणारा विरोध होत असतो.या पाठीमागे राजकीय बळ विरोधक देत असुन समाजाशी संबंध नसणारा माणसांनी याला विरोध केला असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.


उपचारासाठी व शस्त्रक्रियासाठी कोणाच्या डोळ्यात अश्रू येवु देणार नाही आमदार निलेश लंके
माझ्या पारनेर तालुक्यातील अनेक गावात आदिवासी व दुर्गम भागातील लोकांना उपचाराची सोय व्हावी यासाठी पारनेर शहरात ५०० पाचशे बेडचा अद्यावत दवाखाना शासकीय जागेत उभारण्याचा निर्णय घेतला होता. हातावर पोट असणाऱ्या व शेतमजुरी करणाऱ्यांना मोफत व अद्यावत उपचार मिळाले पाहिजे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या पाहिजे. या उदात्त हेतूने रुग्णालय उभारणार होतो.परंतू उपचारासाठी व शस्त्रक्रियासाठी कोणाच्या डोळ्यात अश्रू येवु देणार नाही आमदार निलेश लंके यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button