आबासाहेब काकडे विद्यालयाची शेवगाव शहरातून शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची आज १९ फेब्रुवारी रोजी शेवगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली .या मिरवणुकीमध्ये विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे अनेक विद्यार्थी विविध पथकांमधून सहभागी झाले होते .
मिरवणुकीमध्ये जिजाऊच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी संतोषी वाघ ,बाल शिवाजीच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी अलिना शेख,विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, झांज पथक, ढोल पथक, दिंडी पथक ,विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक पथक,मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी असे विविध पथक सहभागी झाले होते .
या मिरवणुकीमध्ये आबासाहेब काकडे शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ . अड . विद्याधरजी काकडे साहेब ,शिक्षण समूहाच्या विश्वस्त जि . प .सदस्या हर्षदाताई काकडे ,युवा नेतेपृथ्वीसिंग भैय्या काकडे ,शिक्षण समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा .लक्ष्मण बिटाळ ,प्राचार्य संजय चेमटे,उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर,उपमुख्याध्यापिका सौ . मंदाकिनी भालसिंग ,पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे, शिवाजी पोटभरे, श्रीमती पुष्पलता गरुड तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद सहभागी झाले होते .
विविध पथकामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या पथकाचे उत्कृष्ट संचलन करून शेवगाव शहरातील सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले व दाद मिळवली .
यावेळी विद्याधरजी काकडे साहेब व सौ . हर्षदाताई काकडे यांच्या हस्ते शहरातील विविध मंडळांनी स्थापन केलेल्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .
सदर मिरवणुकीचा शेवट छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला . या मिरवणुकीत शेवगाव चर्मकार संघटनेचे अध्यक्ष गोरक्ष वाघमारे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, मनसेचे गणेश रांधवणे, शेवगाव शिवस्मारक समितीचे डॉ निरज लांडे ,डॉ .कृष्णा देहाडराय ,बंडू शेठ रासने तसेच शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
शेवगाव शहरात होत असलेल्या भव्य शिवस्मारकास यावेळी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या वतीने ११११११ / -रुपये निधी देण्याचे संस्थेच्या विश्वस्त जि .प . सदस्या सौ . हर्षदाताई काकडे यांनी जाहीर केले .