इतर

पिंपळगाव रोठा येथे महाशिवरात्री महोत्सव संपन्न 

                      दत्ता ठुबे/पारनेरप्रतिनिधी

:- पिंपळगाव रोठा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथील प्रसिद्ध गावठाणातील पुरातन देवस्थान श्री त्रंबकेश्वर महादेव देवस्थानात सालाबाद प्रमाणे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी डॉ. गजानन महाराज काळे.(कुलस्वामी खंडेराय चरित्राचे पहिले कथाकार)यांचे प्रवचन झाले यावेळी बोलतानात्यांनी   शालेय विद्यार्थ्यांना  व्याकरणातील छोट्या छोट्या गोष्टींचे बारकावे समजावून सांगितले.खंडोबा कथेविषयी बोलताना ते म्हणाले कोरठण गडावरील कथा सर्वात अप्रतीम झाल्याचे वर्णन महाराजांनी केले महाशिवरात्री उत्सवानिमित्त महाशिवरात्रीच्या कथेचे महत्त्व समजावून सांगताना जीवनात त्यागाविषयीचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. यांच्या रसाळ वाणीतून सर्व श्रोते मंत्रमुग्ध होत होते. ते म्हणतात भगवान शिवाची आराधना तो करतो तो खरा वैष्णव आहे.

                    या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते. सन २००४ पासून कै. सौ.उल्हासाबाई विठ्ठल गायकवाड यांचे स्मरणार्थ कीर्तनसेवा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी १२  वाजता महाशिवरातत्री फराळ प्रसादाचं वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला खास करून महिला भावीक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सकाळी ७ वाजता श्री त्रंबकेश्वर महादेव मंदिरात अभिषेक, महापूजा कुलकर्णी परिवारातील श्री शुभम व सौ शितल कुलकर्णी या नवीन दांपत्यांच्या यांच्या हस्ते पार पडली. महाआरती होऊन शिवरात्री महोत्सवाला प्रारंभ झाला. हजारो भाविकांनी श्री त्रंबकेश्वर महादेव देवस्थानचे दर्शन घेतले.

                    ग्रामस्थांनी फराळ महाप्रसादासाठी साबुदाणा,खिचडी,शेंगदाणे,तेल,मिरची,केळी,पत्रावळी,बिसलेरी बॉटल इत्यादी दानशूर ग्रामस्थांनी वस्तूरूप दान स्वरूपात मोठ्या प्रमाणात दिले.तसेच रोख देणगीदारांनी उत्सवासाठी देणगी दिली.आज झालेल्या महाशिवरात्री उत्सवात हजारो ग्रामस्थ व भाविक भक्त महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन कीर्तन व महाप्रसादाचे लाभ घेतला.

                    जय मल्हार विद्यालय, ग्रामपंचायत ,भजनी मंडळे, ग्रामस्थ व मुंबईकर, तरुण मंडळे इत्यादींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button