पिंपळगाव रोठा येथील जय मल्हार विद्यालयाचा रौप्य महोत्सव संपन्न

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
:-पिंपळगाव रोठा येथील जय मल्हार विद्यालयचा रौप्य महोत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विद्यालयाच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळगाव रोठा गावचे उपसरपंच व प्रसिद्ध उद्योजक महादेवशेठ पुंडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षक खैरे सर, गणपत शेठ वाफारे तसेच प्रमुख उपस्थिती श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचे माजी अध्यक्ष ऍड .पांडुरंग गायकवाड, नानाभाऊ भांबरे, धोंडीभाऊ जगताप, बबनशेठ गायकवाड, रवींद्र गोसावी, सुरेशभाऊ फापाळे, जालिंदर खोसे, गोपीनाथ घुले, खंडू सुपेकर,भाकरे सर, बबन चिमाजी पुंडे होते.
सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत वेशीपासून विद्यालयातील विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी लेझीम,ढोल, ताशाच्या गजरात विद्यालयापर्यंत केले. विद्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा परिपाठ सादर केला माजी विद्यार्थी राजाराम मुंडे व मंगेश पंडित यांनी या परिपाठाचे नियोजन केले. त्यानंतर माजी विद्यार्थी वर्गामध्ये जाऊन बसले वर्गात गेल्यानंतर त्यांची हजेरी बॅच वार घेतली. वर्गात बसल्यानंतर त्यांना याच वर्गात आपण २५ वर्षांपूर्वी बसलो होतो तो आनंद आज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता वर्गात त्यांनी फोटो सेशन केले. वर्गातून बाहेर आल्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात दांडिया रास व लेझीम यांचा आनंद या विद्यार्थ्यांनी लुटला.आपण आपल्या वर्ग मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर प्रत्यक्ष इथे शिक्षण घेत आहोत ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती.
नंतर विद्यार्थी स्थानपन्न झाले. अध्यक्ष निवड विद्यालयाचे मुख्याध्यापक सुंबरे सर यांनी केली तर अनुमोदन श्री गरकळ सर यांनी दिले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने सर्व उपस्थितासाठी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर विद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची एक झलक म्हणून लावणी गीत चंद्रा या गाण्यावर शेख आलिषा या विद्यार्थिनीने सादर केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित माजी विद्यार्थी यांचा सन्मान बॅच नुसार शाल, ट्रॉफी, पुष्प देऊन विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केला. या विद्यालयात अनुदानित काळात सेवा देणारे व सध्या इतर ठिकाणी कार्यरत असणारे शिक्षक पारधी सर, मस्के सर सर,गाडगे मॅडम, कमल औटी व खोडदे सर यांचा यथोचित सन्मान केला.

कार्यक्रमाला आलेले विशेष निमंत्रित माजी विद्यार्थी ग्रामस्थ पालक प्रमुख पाहुणे यांचे स्वागत मुख्याध्यापक सुंबरे सर यांनी केले
प्रास्ताविक सादर करताना जरांगे सर यांनी २५ वर्षापासूनचा विद्यालयाचा लेखाजोखा सादर केला.२५ वर्षातील विद्यालयाची शैक्षणिक प्रगती विद्यालयाची असणारी इमारत,भौतिक सुविधा यांचा आढावा तसेच स्कूल बस याबाबतची माहिती थोडक्यात सादर केली. त्यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यालया पुढील संकल्प जागा व नवीन इमारत याबाबत सविस्तर माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नवीन सर्व सुविधांनी युक्त इमारत असली पाहिजे ही गरज प्रतिपादित केली. या इमारतीसाठी अंदाजीत खर्च ९० लाख रुपये येणार आहे .नवीन इमारत संकल्प फलकाचे अनावरण माजी विद्यार्थी,उपसरपंच महादेव शेठ पुंडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेला जागा व नवीन इमारत उभी करण्यासाठी जय मल्हार विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ७,५१,००० हजार रु देणगी देण्याचे घोषित केले. यानंतर माजी विद्यार्थी ग्रामस्थ यांच्याकडून देणगीची नावे देण्यात आली ती पुढील प्रमाणे सुरेशभाऊ फापाळे यांच्या वतीने १५०००० (दिड लाख) रुपये.जयश्री बबन सुपेकर,ज्योत्स्ना बबन सुपेकर,जयंत बबन सुपेकर यांच्या वतीने १५०००० (दिड लाख) रुपये .कै पांडुरंग गोविंद पुंडे यांचे स्मरणार्थ सुदाम शेठ पुंडे परिवारातर्फे १००००० लाख रुपये.योगेश चंद्रभान २५००० हजार रुपये.कै.गणपत विष्णू सुंबरे स्मरणार्थ भूषण उत्तम सुंबरे १५००० हजार रुपये,योगेश सिताराम पुंडे यांच्या वतीने १५००० हजार रुपये,
कै.शंकर सोमगिर गोसावी स्मरणार्थ गोसावी परिवारातर्फे ११००० रुपये, गणेश शिवराम सुपेकर ११००० हजार रुपये,गोपीनाथ कुंडलिक घुले ११००० रुपये,अभिजीत नामदेव जरांगे ११००० रुपये ,सुशांत सावळेराम पवार १११११ रुपये,कै.विठ्ठल रामभाऊ जगताप स्मरणार्थ वेणूबाई विठ्ठल जगताप यांच्या कडून ११००० रुपये,बबन बाळाजी मेहेर ५५५५ रुपये,चंद्रकांत रामदास कुसळकर ५००० हजार रुपये,बबन चिमाजी पुंडे ५००० हजार रुपये,सुजाता बबन पुंडे ५००० हजार रुपये,अक्षय बाबाजी घुले ५००० रु,आबू बाळाजी सुंबरे स्मरणार्थ लक्ष्मण आबु सुंबरे ५००० रु, लहू अबू सुंबरे ५००० हजर रूपये,सिमा सुभाष पुंडे २००० हजार रूपये,मन्सूर शब्बीर चौगुले १००० रू. अशी एकूण नवीन इमारतीसाठी १३,००१५५ (तेरा लाख एकशे पंचावन्न) रुपये देणगी जमा झाली.
ऍड पांडुरंग गायकवाड यांनी आपल्या भाषणांमधून सर्व माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद व त्यांचे आभार मानले तसेच सर्वांनी एकत्र येऊन हे काम हाती घेतले तर अशक्य काहीच नाही असे ते म्हणाले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे व माजी विद्यार्थ्यांचे आभार श्री गरकळ सर यांनी मानले.
रौप्य महोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री उंडे सर, श्री केदारी सर, राजाराम पुंडे,भगवान भांबरे, संतोष घुले, नारायण पुंडे, व श्रीमती केदारे बाई, यांनी परिश्रम घेतले.रौप्य महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ,पालक, हितचिंतक, मुंबईकर, पुणेकर या सर्वांचे आभार जय मल्हार शिक्षण प्रसारक संस्था व जय मल्हार विद्यालय पिंपळगाव रोठा यांच्या वतीने करण्यात आले.