महाबोधी महा विहार बुद्धगया मुक्ती आंदोलनास सांगली जिल्ह्यातील बौद्ध समाजाचा पाठिंबा.

. प्रतिनिधी /डॉ शाम जाधव
सांगली- बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे. तथागत भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र श्रद्धास्थान आहे.बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धांच्याच ताब्यात असले पाहिजे. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे हा नैसर्गिक न्याय ठरेल. त्यामुळे 1949 चा महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीत सर्व सदस्य बौद्धच असावेत असा कायदा करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशा मागणीचे निवेदन सांगली जिल्ह्यातील बोद्ध अनुयायी व बौद्ध संघटना यांनी देत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला देशभरातील तमाम बौद्धाचा पाठिंबा असून सांगली जिल्हयातूनही महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मोठे आंदोलन होणार आहे.
महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायद्यात बदल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे मार्फत भारताचे महामाहीम राष्ट्र्पती, पंतप्रधान, बिहार सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांना निवेदन दिले आहे.

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळवून देण्यासाठी महाबोधी महाविहार बुद्ध गया मुक्त होण्यासाठी व बुध्दगया मंदिर १९४९ कायदा रद्द करावा, असे निवेदन सांगलीच्या निवासी उपजिल्हाधिकारी, ज्योती पाटील मॅडम यांना देण्यात आले.
यावेळीस भिक्खू संघांचे, पूज्य भन्ते धम्मदीप, पूज्य भन्ते गोविंदो मानदो, पूज्य भन्ते ज्ञानज्योती,तसेच डॉ. सुधीर कोलप, अध्यक्ष बौद्ध धम्म संस्कार श्रा वस्ती विहार सांगली, सुरेश दुधगावकर, जगन्नाथ ठोकळे, प्रा. कैलास काळे, जितेंद्र कोलप, रतन तोडकर, पारमित धम्मकीर्ती, प्रा. रवींद्र ढाले, सी.बी.चौधरी, प्रकाश होवाळे, डॉ.सचिन सवाखंडे, प्रा.अशोक भटकर, डॉ नितीन गोंधळे,भारती भगत, शेवंता वाघमारे, सुजाता पवार, निर्मला घाडगे, बळवंत लोखंडे, पवन वाघमारे, चांगदेव कांबळे, सुहास धोत्रे, पी.एम.कांबळे डेप्युटी इंजिनियर, प्रेमानंद कांबळे आदी मान्यवर तसेच भारतीय बौद्ध महासभा, श्रावस्ती विहार, लूंबिनी विहार,दीपस्तंभ विहार,रमाई विहार, विश्वशांती विहार, सारनाथ विहार, बुद्धीस्ट इंटरनशनल, सम्यक विहार, आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार संघ या बुद्ध विहारांचे ट्रस्टी, व सांगली जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.