राजूर येथे सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आनंद मेळावा साजरा

विलास तुपे/राजूर प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजुर येथील अभिनव शिक्षण संस्थेच्या सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बालदिनाच्या निमित्ताने आनंद मेळावा साजरा करण्यात आला
. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.गौराम बिडवे व सौ तेजश्री बिडवे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी व्यवहारिक ज्ञानाचे आकलन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम प्रत्येक शाळेत घेण्यात यावा असे प्रतिपादन शाळेच्या प्राचार्या स्मिता पराड यांनी केले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रत्येक स्टॉल ला भेटी दिल्या. या आनंद मेळाव्यात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे, शालेपयोगी वस्तु, भाज्या आदींचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते तसेच मनोरंजनपर खेळांत बक्षिसे मिळवत आनंद घेतला.
तब्बल 50 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. मेळाव्याचा मनमुराद आनंद लुटत पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास आशिष हंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा पाटील, मनिषा सोनवणे, दीप्ती लहामगे, कल्पना सुकटे, अर्चना साबळे, मुक्ता वाकचौरे आदी शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर क्षिरसागर यांनी केले.
