काकनेवाडीत विविध उपक्रमातून साजरा केला शिवजयंती उत्सव!

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथे विविध उपक्रमातून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला शम्भूराजे मित्र मंडळ, निलेश लंके प्रतिष्ठान आणि काकनेवाडी ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे, लेझीम प्रात्यक्षिक, ग्रुप डान्स असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बक्षीस रूपात रोख रक्कम रुपये 5151रूपये, कै. रावबा लक्ष्मण वाळुंज यांच्या स्मरणार्थ गं.भा.सिताबाई रावबा वाळुंज व श्री ज्ञानदेव रावबा वाळुंज (से.नि. मुख्याध्यापक) यांच्याकडून साऊंड सिस्टिम ढोल माईक स्टॅन्ड 20000 रूपये, श्री गवरामशेठ चिमाजी वाळुंज (अध्यक्ष शम्भू राजे मित्र मंडळ ) स्वामी समर्थ रोडलाईन्स , यांच्याकडून 43 ” LED 24500 रूपये, श्री अंबादास हरिभाऊ वाळुंज सदस्य,शंभूराजे मित्र मंडळ काकणेवाडी यांच्याकडून शाळेच्या वाचनालयासाठी प्रेरणादायी पुस्तके (अग्निपंख श्यामची आई इत्यादी) 5000 रूपये तसेच स्कॉलरशिप परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोसाहनपर शालेय दप्तर, वही पेन इ.बक्षीसे देण्यात आली.
लोकसहभागातून रोख रक्कम व वस्तुरुपात एकूण 54,651 रूपये जमा झाले. या सर्व थोर देणगीदारांचे
शाळा व्यवस्थापन समिती,अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य ,मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक यांचे शम्भूराजे मित्र मंडळ, निलेश लंके प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ काकनेवाडी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
