नगरसेवक देवराम ठुबे यांचा बाल अनाथाश्रमात वाढदिवस साजरा!

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
युवा नगरसेवक देवराम ठुबे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमीत्त आदर्श ग्रामीण महिला मंडळ संचलित निराधार बाल आश्रम टाकळी ढोकेश्वर या अनाथाश्रमात जाऊन तेथील मुलांना वाढदिवसानिमित्त जेवणासाठी ताटे , जेवताना बसण्यासाठी बसकर तसेच खाऊचे वाटप केले.
ज्या मुलांना वडिल किंवा आई नसते अशा बालकांचा सांभाळ या अनाथाश्रमात केला जातो.या अनाथाश्रमात सुमारे दिडशे (150) मुले/ मुली शिक्षण घेत आहेत.वाढदिवसानिमित्त त्यांच्या सोबत नगरसेविका निता देवराम ठुबे,नगरसेविका विद्या अनिल गंधाडे,
घनश्याम कारले, नगरसेवक ऋशिकेश गंधाडे,
गणेश ठुबे, बबलूराजेे,गणेश शिंदे, ऋषिकेश कावरे,
नगरसेवक युवराज दादा पठारे तसेच ज्ञानेश्वर औटी (माऊली ) हे उपस्थित होते.

आश्रमाचे संस्थापक सौ.मंगल रावसाहेब झावरे,राहुल रावसाहेब झावरे,शिक्षक विष्णू जानकू भद्रे,शिक्षक बाळशिरम दिनकर देवकर मुलांसोबत राहत्यात.या मुलांना मोठे करण्याचे काम त्यानी हाती घेतले आहे.
प्रत्येकाने आपला वाढदिवस अनाथाश्रमात जाऊन साजरा करायला हवा अशी भावना यावेळी नगरसेवक देवराम ठुबे यांनी व्यक्त केली.