समर्थ अकॅडमीचे कार्य कौतुकास्पद ! आ.निलेश लंके !

विविध गुणदर्शनाच्या माध्यमातून समर्थ अॅकॅडमीचे स्नेहसंमेलन झाले उत्साहात साजरे !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
शैक्षणिक क्षेत्रात सर्व शैक्षणिक उपक्रम राबवत तसेच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना एक दर्जेदार शिक्षण मिळावे हा अट्टाहास असणारे समर्थ अकॅडमीचे संचालक कैलासजी गाडीलकर सर हे नेहमीच अग्रस्थानी असतात.विद्यार्थ्याच्या बुद्ध्यांकावरून व त्याच्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांची पारख करत त्याला असणाऱ्या आवडीच्या क्षेत्रात नेहमीच व्यासपीठ देत आले आहेत .असे यावेळेस जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोकराव कडूस यांनी सांगितले .
शुक्रवारी १७ फ्रेब्रुवारी रोजी सायंकाळच्या प्रसन्न वातावरणात श्री.समर्थ अकॅडमीच्या भव्य प्रांगणात पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोकजी कडूस साहेब जिल्हा परिषद सदस्या सौ.राणीताई निलेशजी लंके भारत पेट्रोलियमचे टेरिटोरी कोऑर्डिनेटर श्री.कीर्तीकुमार शिंदानी आणि प्राचार्य भाऊसाहेब अनारसे , डॉ.अरुणाताई भांबरे , श्री.गणेश देठे सर , भारत पेट्रोलियमचे श्री. निरंजन यादव,अमित कुमार राय,प्रमोद पाठक
पत्रकार संघाचे मार्तंडराव बुचुडे सर , श्रीकांत चौरे,शिवाजीराव पानमंद सर ,सुभाषराव दिवटे,अलिबाग येथील इरिगेशन अभियंता विनायक कुलधर ,निता कुलधर, शशिकांत रासकर सर ,सोमनाथ खोबरे सर यांच्या सह परिसरातील विविध गावांमधील सरपंच , उपसरपंच पालक व ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमागदार सोहळा पार पडला .
श्री समर्थ अकॅडमी संचालित श्री.समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सने आयोजित केलेल्या दहाव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले .
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री . अशोकराव कडूस साहेब यांच्या हस्ते विविध उपक्रमात नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले .
आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पारनेरचे नगरसेवक श्रीकांत चौरे यांना नुकताच जाहीर झालेला पत्रकारितेचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे या दिमागदार सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आले .
विद्यार्थ्यांच्या गुणदर्शन कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या समर्थ अकॅडमीच्या तसेच गतवर्षी एज्युकेशन एक्सलन्स अवार्डने सन्मानित झालेल्या उच्चशिक्षित संचालिका सौ.शिल्पा गाडीलकर मॅडम यांचे जिल्हा परिषद सदस्या सौ. राणीताई लंके यांनी कौतुक करत आपल्या शुभेच्छा पर भाषणात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी गाडीलकर कुटुंबाचे योगदान फार महान आहे.असे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. देठे सर यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.सौ.भामरे मॅडम व सौ.ठुबे मॅडम यांनी केले.तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे प्राचार्य देठे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद ,बीएड व पॉलिटेक्निक कॉलेजचे सर्व सहकारी विद्यार्थी व पालकांचे आभार श्री . समर्थ अकॅडमीचे संचालक कैलासजी गाडीकर सर यांनी मांनले .

:
समर्थ अकॅडमीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून भविष्यामध्ये त्यांना स्वतःचे अस्तित्व कसे सिद्ध करता येईल. विद्यार्थी मित्रांना प्रेरणादायी शिक्षण व कलागुणांना कसा वाव मिळेल याचा विचार करत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत आसतात.व त्यातुन सर्वाधिक मुलांना बक्षीस पात्र कसे करता येईल या उद्देशाने उपक्रम राबवले जातात याचे समाधान वाटते. जे विद्यार्थी वर्षभर मेहनत घेत असतात त्याची कौतुकाची थाप मिळाल्यास विद्यार्थी त्या क्षेत्रात नव्या उमेदीने कार्यरत होतो . व तो यशस्वी प्रयत्न गाडीलकर सर या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातुन नेहमीच सिद्ध करत आले आहेत .
आ.निलेश लंके