इतर

रंग पंचमी साठी नैसर्गिक रंग तयार करुयात.! शिकण्याचे प्रात्यक्षिके

पद्मशाली सखी संघम चा उपक्रम

सोलापूर– ‘रंगपंचमी’ मार्चच्या दुस-या आठवड्यात येत आहे. लहान मुले जीवापेक्षा जास्त ‘रंगपंचमी’ सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. ‘रंगपंचमी’ साजरी करत असताना सर्रासपणे रासायनिक (केमिकल) रंग वापरल्याने शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतोच. त्यासाठी मुलांमध्ये जागृती होण्याच्या दृष्टीने ‘नैसर्गिक रंग’ कश्या पध्दतीने तयार करतात याची प्रात्यक्षिके (कार्यशाळा) सोलापूरातील पद्मशाली सखी संघमच्या वतीने पूर्व भागातील भद्रावती पेठ येथील (श्री मार्कंडेय रुग्णालय जवळील) कै. आशय्या ईरय्या आरकाल आंध्र भद्रावती मराठी विद्यालय येथे १ मार्च रोजी आयोजन केल्याचे माहिती पद्मशाली सखी संघमच्या कार्याध्यक्षा सौ. लक्ष्मी चिट्याल यांनी दिले आहे.

केमिकल्स रंग वापरल्याने त्याचा डोळे, केस आणि शरीरावर मुख्यतः त्वचावर विपरीत परिणाम होतो. दिवसेंदिवस अनेकांचे रासायनिक रंग वापरण्याकडे कल दिसतो. निसर्गाने अनेक युक्त्या दिले असून माणसाला श्रम करण्याची आवड कमी होत असल्याने रासायनिक रंग वापरत आहे. निसर्गाकडून विविध रंगांचे फूल उपलब्ध असून त्या माध्यमातून तयार करणे आवश्यक आहे. सोलापूरातील सामाजिक वनीकरण विभागाचे संजय भोईटे आणि इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे हे विविध फुलांपासून नैसर्गिक रंग कश्या पध्दतीने तयार करतात याची प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन करणार आहेत.

बुधवार, दि. १ मार्च रोजी सकाळी ठीक
९. ३० वाजता होणा-या नैसर्गिक रंग शिकण्याचा कार्यशाळेत इतर शाळेतील विद्यार्थीही सहभागी होउ शकतात. तरी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी, पालक आणि इतर मुले सहभाग व्हावेत, असे आवाहन पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा सौ. माधवी अंदे, सौ. उपाध्यक्षा संध्याराणी अन्नम, सचिवा सौ. ममता मुदगुंडी, सहसचिवा सौ. जमुना इंदापूरे, सहकार्याध्यक्षा सौ. वैशाली व्यंकटगिरी, खजिनदार सौ. प्रभावती मद्दा, सहखजिनदार सौ. ममता तलकोकूल, समन्वयिका सौ. अंबिका पेगडा, सौ. मीना नंदाल, सदस्या वनिता सुरम, सुनिता निलम (क्यामा), अरुणा आडम आणि आरती बुधारम यांनी के
ले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button