श्री ढोकेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी अवधूत चौरे याची नवोदय साठी निवड !

आ.लंके यांनी कौतुक करत दिल्या शुभेच्छा !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याला गुणवंतांची खाण समजले जाते त्याप्रमाणे तालुक्याने आजवर विवीध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वला ठसा उमटविनारे मौल्यवान हिरे पारनेर तालुक्यात जि.प.शाळेत शिकुन IAS – IPS झालेले आहेत .
त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळी ढोकेश्वर मध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी चि. अवधूत दत्तात्रय चौरे या विद्यार्थाची शैक्षणिक पार्श्वभुमी पाहता त्याचे आजी-आजोबा व आई वडील सर्व शिक्षक आहेत . व आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांचे वशंज आसल्या कारनाने घरी आध्यत्मिक वारसा आसलेल्या कु .अवधुतची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. निवड प्रवेश परीक्षा एप्रिल महिन्यात झाली होती. यातून अहमदनगर जिल्ह्यातून या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. तसेच तो राज्य गणित प्रज्ञा परीक्षेमध्येही जिल्ह्यात गोल्ड मेडल मिळवून प्रथम आला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सन्मा. नंदकुमार झावरे पाटील साहेब, सचिव जी. डी. खानदेशे साहेब, ज्येष्ठ विश्वस्त सितारामजी खिलारी पाटील, माजी सभापती राहुल भैया झावरे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, प्राचार्य सुरेश जावळे सर, पर्यवेक्षक शिवाजी सावंत सर, बाळासाहेब निवडुंगे यांनी अभिनंदन केले. त्याला वर्ग शिक्षक निलम खिलारी, वाघसकर सर, अतुल सैद, शेळके मॅडम, पवन कुटे व त्याचे पालक श्री. दत्तात्रय चौरे सर, लता चौरे मॅडम, यांचे मार्गदर्शन लाभले .
अवधुतच्या या यशाबद्दल समस्त अविनाश पारख पद समाज व पारनेर नगर विधान सभेचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी या गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक करत त्याला भावी शैक्षणीक कार्यास शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले आहे .