क्राईम
सोनई येथील मारुती मंदीरातील घंटा चोरली!

सोनई प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सोनई येथील नदीपात्रातील जागृत मारुती मंदीरातील पिताळाची असलेली तीन ते चार हजाराची मोठी अवजड घंटी चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
सकाळी भाविक दर्शनासाठी गेले असता,ही बाब निदर्शनास आल्याने सकाळपासून चर्चा सुरू होती, . या अगोदर दानपेटी फोडून पैसे चोरीला गेले होते. त्याचाही अजून पत्ता नाही,त्यात काल मंदिरातील घंटा व चांदीचे डोळे चोरट्याने लांबवले., दुसऱ्यांदा चोरी झाल्याने तीच व्यक्ती असू शकते, असा अंदाज बांधता येतो, त्यामुळे ग्रामस्थांनी जागरूक राहून सुरक्षा यंत्रणा असावी अशी मागणी नागरीक करत आहेत, पोलीस प्रशासन यांनी तपास लावून चोरटे पकडण्याची मागणी केली आहे.