इतर

आमदार लंकेचा खासदार विखेंना टोला, …..म्हणाले आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे बंद करा!

दत्ता ठुबे

नगर :- नगर तालुक्यातील वाकोडी- वाळूंज रस्त्याच्या ३ कोटी रूपयांच्या कामाला मंजूरी मी आणली. गेल्या आठवड्यात वाकोडी येथे या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मात्र खासदार
डॉ. विखेंनी केले. स्वतःची कामे दाखवा, त्यांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करा, इतरांच्या आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम बंद करा असा टोला नगर- पारनेर विधानसभेचे आमदार निलेश लंके यांनी वाकोडी येथे खासदार डॉ. सुजय विखे यांना लावला आहे.
नगर तालुक्यातील वाकोडी फाट्याकडून वाकोडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर एमआयआरसी जवळील रस्त्यावर दोन कोटी रूपयांच्या पूलाचे भूमिपूजन तसेच ९० लाख रूपयांच्या प्राथमिक उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण या वेळी करण्यात आले. ते यावेळी वाकोडी येथे आमदार लंके बोलत होते.
यावेळी माजी आमदार दादा कळमकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे प्रवीण कोकाटे, प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेते तालुका प्रमुख रोहिदास कर्डिले, प्रकाश पोटे प्रियंका लामखडे यांच्यासह तालुक्यातील महाअाघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी सचिन तोडमल यांनी वाकोडीचे विविध प्रश्‍न मांडले त्यास भाऊसाहेब कराळे यांनी अनुमोदन दिले, रमेश इनामकर, अमोल तोडमल, भाऊसाहेब मोढवे, दत्तात्रय खांदवे, शनैश्‍वर पवार,प्रदिप पवार, अमोल गोरे या ग्रामस्थांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.


लग्न एकाचे.. नाचतोय दुसराच
मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना जिल्हा परिषदेच्या विविध योजनांतून केलेल्या कामांचे आता लोकार्पण करून आम्ही ही कामे केल्याचा आव आणत आहेत. याचा निधी कोणाचा, कामे केली कोणी आसा टोला खासदार डॉ. विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना प्रताप शेळके यांनी लग्न कोणाच, अन नाचतं कोण? असे म्हणत टोला लावला.

लंके पुढे म्हणाले, २४ नोव्हेंबरला या वाकोडी- वाळुंज रस्त्याच्या कामाला मंजूरी मी आणली आणि गेल्या आठवड्यात यांनी लोकांची दिशाभूल करत हे काम आपणच आणल्याचे सांगत भूमिपूजन केले, जिल्हा परिषदेच्या विविध योजनेतून झालेल्या कांमाचे लोकार्पण करण्याचा सपाटा या जोडीने लावला असल्याचा या वेळी आमदार लंके यांनी उपस्थित नागरिकांना जी. आरची प्रत दाखवत ही मंडळी कशा प्रकारे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटत असल्याचे निदर्शनास आणले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा कळमकर म्हणाले, केंद्र व राज्य सरकारचे महागाई कडे दुर्लक्ष करत फक्त महाअघाडीच्या काळात मंजूरी मिळालेल्या कामांना बजेट मंजूर होऊनही फक्त स्थगिती लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यांना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांचे काही देणे घेणे नाही. या वेळी संदेश कार्ले, रोहिदास कर्डिले, प्रताप शेळके यांनी आपले मनोगते व्यक्त केलीे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button