नेवासा तालुक्यातील विविध गुन्ह्यातील 11 आरोपींना सोनई पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

दत्तात्रय शिंदे
नेवासा तालुक्यातील विविध गुन्ह्यांत पोलिसांना हवे असणाऱ्या 11 आरोपींना सोनई पोलिसांनी गजाआड केले सोमवार दिनांक 12 जून रोजी सोनई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली . गुन्हेगारी क्षेत्रातील आरोपींना सोनई पोलिसांनी मोठा झटका दिला आहे
सोमवारी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दि 12 रोजी नॉन बेलेबल वॉरंटच्या सहा आरोपींना अटक करण्यात आली तसेच बेलेबल वॉरंट मधील
13वारटची बजावणी करण्यात आली त्याचबरोबर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 124/2023 भा द वी कलम 326, 324,143,147 मधील 18 मार्च2023 पासुन फरार असलेले पाच आरोपींना अटक करण्यात आली असे एकुण 11
आरोपींना आज अटक करण्यात आली
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सुरेश पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पी एस आय राजेंद्र थोरात हेड कॉन्स्टेबल प्रविण आव्हाड अंकुश दहिफळे, दता गावडे, मच्छिंद्र अडकिते, पो कॉस्टेबल विठ्ठल थोरात, अमोल जवरे, मृत्युंजय मोरे, महेंद्र पवार ज्ञानेश्वर आघाव यांनी ही कामगिरी केली.
एकाच वेळी झालेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी
क्षेत्रात आरोपींची धांदल उडाली आहे.