समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात, 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा:- समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून अंदाजे 33 प्रवाशी प्रवास करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात बसचे टायर फुटले.
टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित बस थेट डिव्हायरला धडकली. अपघातानंतर बसने क्षणात पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. बसमध्ये अडकून पडल्याने 26 प्रवाशांचा कोळसा झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेस आहे. सध्या मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या भीषण अपघातामध्ये चालकासह 8 जणांचा जीव वाचला आहे. जखमींना बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी दिली आहे.
सदर बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास टायर फुटल्याने बस पलटी झाली आणि डीव्हायडरला धडकली. अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतला, अशी माहिती बसचालकाने दिल्याची पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी दिली.
सिंदखेडराजा, जि. बुलढाणा परिसरात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटली. या अपघातात काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही बातमी अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा खासगी बसच्या वेगावरील कायदेशीर नियंत्रणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा ही विनंती, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
सिंदखेडराजा, जि. बुलढाणा परिसरात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटली. या अपघातात काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. हि बातमी अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहे