इतर

अनुसिद्ध सेवाभावी संस्थेचा शिवजिजाऊ गौरव सन्मान

दत्ता ठुबे

सांगली -श्रीमंत राजमाता जिजाऊ राष्ट्रगौरव समिती व संकल्प युवाशक्ती महाराष्ट्र राज्य आयोजित, गीता सेवाभावी संस्था सांगली व देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या मान्यतेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या गौरवासाठी राज्यस्तरीय “शिवजिजाऊ गौरव सन्मान सोहळा” दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी सांगली येथे उत्साहात पार पडला.

या राज्यस्तरीय “शिवजिजाऊ गौरव सन्मान सोहळा करिता अनुसिद्ध सेवाभावी एज्युकेशन सोसायटी सुभाषनगर ता. मिरज जि. सांगली या संस्थेला प्रमुख पाहुणे राष्ट्रीय आदर्श शिक्षक श्री. अनिल मोहिते सर, आर. एस. पी. अधिकारी मा. विशाल कांबळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक मा. सुनिल मुळे, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मा. सचिन चोपडे सर यांच्या हस्ते सामाजिक संस्थारत्न गौरव करण्यात आला.
अनुसिद्ध सेवाभावी एज्युकेशन सोसायटी हि शैक्षणिक, सामाजिक, कला, साहित्य, कृषी ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण विकास, क्रीडा व वैद्यकीय क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याच्या उदेश्याने अविरतपणे कार्य करीत आहे. अनुसिद्ध सेवाभावी एज्युकेशन
सोसायटी हि संस्था गेली अनेक वर्षे संस्थेच्या उद्देशपूर्तीकरिता ग्रामीण भागातील महिलांना कौशल्याभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहे.
तसेच संस्थेमार्फत ग्रामीण भागातील गरजू, होतकरू व शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून कौशल्याभिमुख प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे अविरत कार्य करीत आहे.
संस्थेमार्फत शासकीय नोकरीस उपयुक्त बांधकाम पर्यवेक्षक, लॅण्ड सर्वेईंग, बेसीक कॉम्प्युटर ट्रेनिंग, कॉम्प्युटर अकौंटिंग टॅली, कॉम्प्युटर टायपिंग मराठी व इंग्रजी 30/40 स्पिड सर्टिफिकेट कोर्स सुभाषनगर मध्ये संस्थेमार्फत चालवले जातात. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत बस पासची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच सर्व जाती धर्मातील ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांकरिता संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोर्स करिता फि मध्ये विशेष सवलत देउन एक सामाजिक उपक्रम राबविला जात आहे.
१) ज्या विद्यार्थ्यांना आई-वडिल नाहीत
२) ज्या विद्यार्थ्यांना अपंगत्व आहे
३) ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षणापासून वंचित आहेत
४) ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामुळे मयत झाले आहेत
५) विधवा व निराधार महिला
६) देशासाठी शहिद झालेल्या जवानांच्या पाल्यांना व विद्यार्थ्यांना विना अनुदानित तत्वावर चालविण्यात येणाऱ्या शासकीय कोर्सला प्रवेश घेण्यासाठी संस्थेमार्फत कोर्स फि मध्ये विशेष सवलत कायमस्वरूपी देण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button