यशोमन्दिर पतपेढीचा वर्धापन अकोले शाखेत साजरा!

अकोले/ प्रतिनिधी
सहकाराचा जिव्हाळा संपूर्ण महाराष्ट्रात कैलासवासी सहकार महर्षी भाऊसाहेब हांडे यांच्या रूपाने निर्माण झाला त्याचा आदर्श
मुंबई येथे नोकरी व व्यवसाय निमित्ताने गेलेल्या ब्राह्मणवाडा व पंचक्रोशीतील सर्वच लोकांनी एकत्रित येऊन मुंबई नगरीत यशोमंदिर संस्था उभारणी केली त्या संस्थांचा वेलू संपूर्ण राज्याला आदर्शवत ठरणारा आहे याचा आम्हास अभिमान वाटतो, यशोमंदिर हा एक परिवार निर्माण झाला असून या परिवाराच्या माध्यमातून मुंबई नगरीमध्ये नव्हे तर संपूर्ण राज्यात सर्वसामान्य नागरिकाला उभे करण्याचे काम या चळवळीने केले आहे ही चळवळ अत्यंत पारदर्शक पद्धतीने सुरू असून यामध्ये सर्वसामान्य माणसाला उभे करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे ही संस्था शिवडी येथे त्
43 वर्षापूर्वी छोट्याशा बचत गटाच्या माध्यमातून सुरू झाली यामध्ये विद्यमान संचालक माजी अध्यक्ष मधुकरराव गायकर कै.रमाकांत शेळके.सहकार महर्षी सगाजीराव हुलवळे यासह अनेक नेत्यांचे योगदान असून राज्यातील सहकार क्षेत्राला नक्कीच आदर्शवत ठरली आहे असे मत विधी तज्ञ के बी हांडे यांनी बोलताना व्यक्त केले
यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव संतु आरोटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते
यशोमंदिर सहकारी पतपेढी च्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्ताने संस्थेच्या मुख्यालय सह राज्यभरातील सर्व शाखांमध्ये विधीवत पूजा करून साजरा करण्यात आला यावेळी अकोले शाखेत वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ सभासद भिसे बाबा. पत्रकार विश्वास आरोटे , उद्योजक दत्ता धुमाळ . अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे माजी संचालिका अलका धुमाळ माजी प्राचार्य विठ्ठल गायकवाड. अशोक आवारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
या संस्थेने सर्वसामान्य माणसाला वेळोवेळी कर्ज पुरवठा केल्यामुळे अनेकांना उभे राहण्याची उभारी मिळाली ही चळवळ आज राज्यभरात सुरू असून या संस्थेचा आदर्श इतर संस्था घेतात
या संस्थेचे 75000 सभासद राज्यभरात
असल्याचे विश्वास आरोटे यांनी सांगितले
संस्थेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव आरोटे यांनी शाखांना जी गरज आहे ती गरज आम्ही तातडीने मार्गी लावू कर्जवितरण ठेवी या सर्व घटकांना प्राधान्यक्रम दिले जाते आज या संस्थेने 43 वा वर्धापन दिन साजरा करत असताना अनाठायी खर्चाला फाटा देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवींना संरक्षण देणे व्यापारी वर्गाला कर्जपुरवठा करून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे या पुढील काळात देखील सर्वांना बरोबर घेऊन सहकाराचा जीवाला पुढे नेण्यासाठी आम्ही बाधिंल राहु असे सांगितले तर यावेळी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शाखाधिकारी दिनकर गायकर. गुणवंत अधिकारी रोखपाल जालिंदर चव्हाण.लिपिक अनिताताई फापाळे. शरदराव मोरे तर आभार प्रदर्शन दिनकर गायकर यांनी मानले