इतर

कांद्याचे बाजार भाव कोसळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा ४ मार्चला सुपात रस्ता रोको !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
सध्या कांद्याला रूपया दोन रुपया कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी ४ मार्च रोजी नगर पुणे महामार्ग सुपा येथे रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासंबंधीची निवेदन तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या असून या रस्ता रोकोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा आमदार निलेश यांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून केंद्र व राज्य सरकारकडे कांदा शेतकऱ्यांना किमान कांद्याला १५ ते २० रुपये किलो हमीभाव मिळाला पाहिजे. तसेच केंद्र सरकारने कांद्या वरील निर्यात बंदी ही कायमस्वरूपी उठवावी . कांदा पण शेतकऱ्याला प्रति किलो दोन रुपये अनुदान शासनाने द्यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे तर कांदा उत्पादनासाठी लागणारा एकरी खर्च व मिळणारी उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण आतबट्ट्याचा व्यवसाय झालेला आहे.तर दुसरीकडे या कांद्यासाठी लागणारी खते औषधे व मजूर यांचे खर्च मोठा असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे त्यामुळे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नगर पुणे महामार्ग सुपा येथे ४ मार्च रोजी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांची शिष्टमंडळ आमदार निलेश लंके यांच्या भेटीला.. एकीकडे कांदा उत्पादन घेण्यासाठी अफाट खर्च तर दुसरीकडे कांदा विक्री कवडीमोल भावात होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशा पाणी आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा कांद्यासह इतर शेतीमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी आमदार निलेश लंके यांना लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी सचिन पठारे यांच्या सह कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश नामदेव पवार विलास वामन पवार उत्तम बाबुराव पवार गुलाब विठ्ठल येणारे कुमार तात्या भाऊ पवार साहेबराव विठ्ठल येणारे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेली ४ महिन्यापासून उन्हाळी व पावसाळी कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव मिळत नाहीत. गेली एक महिन्यापासून झालेल्या उत्पादन खर्चाच्या निम्मे रुपये शेतकन्यांच्या पदरी पडत आहेत. तरी शेतकऱ्यांच्या उदर निर्वाहाचे व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शेतीमालाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. तरी आपण येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट दुर करण्यासाठी आपले विचार मांडावेत. जेणेकरुन सत्ताधाऱ्यांना याची जाणीव होईल. व आम्हा गरीब शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल असे या निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button