इतर

घाटघर येथे डॉ .डी . वाय . पाटील महाविद्यालयाची बचत गटांसाठीची राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

विलास तुपे
राजूर/प्रतिनिधी.

वन्यजीव विभाग महाराष्ट्र शासन व डॉ डी वाय . पाटील युनिटेक सोसायटीच्या, डॉ. डी वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी व डॉ .डी . वाय पाटील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण ही राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच घाटघर या ठिकाणी संपन्न झाली .
जंगलाच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा ,जंगलाला आपल विश्व माणनारा आदिवासी समाज खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात येणे ही काळाची गरज आहे . देश महासत्ता होत असताना आर्थिक विकास घडवून
आणण्यासाठी मांडण्यात आलेल्या १७ शाश्वत ध्येय्यांपैकी सर्वात पहिले ध्येय म्हणजे द्रारिद्रय दुर करणे . दारिद्रय दुर झाले तर बऱ्याच प्रश्नांची उलगड आपोआप होईल .
आदिवासी महिला सक्षमीकरणासाठी सज्ज झाली तर संपूर्ण कुटुंब सुधारू शकते आणि यासाठी बचतगट हे प्रभावी साधत आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत बचतगटाच्या महिलांसाठी बाएफ या संस्थेच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते . यात प्रशिक्षणात रतनवाडी , साम्रद , घाटघर येथील १२८ महिला तसेच इतर महाविद्यातील ३० प्राध्यापक सहभागी झाले होते .
सदर कार्यशाळेच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा डॉ पंडीत विद्यासागर , जागतिक बँकेचे सल्लागार मा विश्वास जपे , प्रिमियम कंपनीचे उच्च पदस्त .कोठाडिया , प्राचार्य डॉ शिवाजी ढगे , अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य मा डॉ सोमनाथ पाटील , मा डॉ . सानप , भंडारदरा वन्यजीव विभागाचे अधिकारी मा. .अमोल आडे , मा . डी डी पडवळे तसेच
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . मोहन वामन तसेच मा .डॉ . मानसी कृतकोटी हे उपस्थित होते .
सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील , उपाध्यक्ष मा. डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा. डॉ. सोमनाथदादा पाटील, प्राचार्य मा डॉ मोहन वामन तसेच मा प्राचार्य डॉ रणजीत पाटील यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम आयोजनात कार्यक्रम सम्नवयक डॉ . मिनल भोसले , डॉ मानसी कृतकोटी , डॉ मुकेश तिवारी , प्रा मंजूषा कोठावडे , प्रा . खालीद शेख , प्रा . सतीश ठाकर , प्रा मयुर मुरकुटे , प्रा . अभिषेक पोखरकर ,प्रा . करिश्मा सय्यद , प्रा मैथीली मुळे , प्रा संतोषी साळुंखे , प्रा रोहीत वरवडकर , प्रा. धनश्री भुजबळ , प्रा माधूरी वर्तळे यांनी सहभाग नोंदवला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button