घाटघर येथे औषधी वनस्पतींच्या वापरा संबंधीची कार्यशाळा संपन्न.

विलास तुपे/ राजूर प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वन्यजीव विभाग, नाशिक डॉ. डी वाय – पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पतींच्या वापरा संबंधीची कार्यशाळा इकोसीटी घाटघर येथे पार पडली
. या कार्यशाळेत राज्यातून आणि राज्या बाहेरील एकुण ६० व्यक्तींनी सहभाग नोंदवला सदर कार्यशालेच्या उद्घाटन प्रसंगी वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ.एस आर यादव यांनी अध्यक्षपद भूषवल तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक वनरक्षक गणेश रणदिवे हे उपस्थित – होते. उद्घाटनप्रसंगी आयुर्वेदाचाय डॉ अशोक बाली यांनी औषधी वनस्पतीच्या वापरासाठी
अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. असेच वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक डॉ. महेंद्र खाडे यांनी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील औषधी वनस्पतींच्या उपलब्धते विषयी अतिशय उपयुक्त असे व्याख्यान दिले . याशिवाय वनस्पतीशास्त्रान
डॉ मसुर नंदीकर यांनी औषधी वनस्पतीची धार्मिक वापर आणि धार्मिक पार्श्वभूमी याबद्दल ची माहीती सादर केली. कार्यशाळेच्या प्रमुख उपक्रमांपैकीअतिशय मोलाचा भाग व अभयारण्यातील आजू बाजूचे गावातील आणि वाड्या-वस्त्यांवरी वैदयांच्या मार्गदर्शनाने परिपूर्ण झाला, कार्यशाळेत झालेल्या १५-२० वैदयांनी सोबत आणलेल झाड-पाला, खोड, कंद,मुळे यांचे प्रदर्शन भरवून वनस्पतींच्या वापरा बाबत अतिशय उपयुक्त माहीती वैदयांनि दिली. सर्व वैदय आणि मान्यवरांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे औषधी वनस्यती वापरासंबंधीच्या माहीतीचा प्रसार हा कार्यशाळेच्या महत्त्वाचा उद्देश सफल झाला. आयुर्वेदीक औषधी उत्पादक कंपनीच्या संस्थापक डॉ. विकास कांडेकर यांचेही या कार्यशाळेत मोलाचे मार्गदर्शन लाभले
या कार्यशाळे दरम्यान – घाटणदेवी अभयरण्य परीसरातील हिरवा माळ रान येथील घनदाट जंगलातील वनस्पतींची माहिती आणि अभ्यास प्रत्यक्ष भेटीद्वारे करण्यात आला.
यांच्या माहितीचा उपयोग औषधी वनस्पतीया वापरात करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ मोहन वामन यांनी वनस्पतीसंबंधीच्या माहितीचे आदान-प्रदान ही काळाची गरज असे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेच्या
सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. मुकेश तिवारी यांनी परिश्रम घेवून कार्यशाला यशस्वी होण्यासाठी मदत केली या कार्यशाळे साठी डॉ. डी. वाय.पाटील युनिटेक सोसायचीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील उपाध्यक्ष डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, सेक्रेटरी डॉ सोमनाथ दादा पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता पाटील डॉ.यशराज दादा पाटील यांचे मार्गदर्शन यशस्वी होण्यासाठी लाभले
या कार्यशाळेचा उपक्रमांचे साठी प्रा.सतिश ठाकुर प्रा. वरवाडकर प्रा.हेमल ढगे डॉ वर्षा निबाळकर , प्रा करिस्मा सय्यद प्रा. संध्या पाटील मयूर मुरकुटे प्रा.खालिद शेख,नाथा झडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
