
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भायगाव येथे सालाबादप्रमाणे स्व. ह.भ.प.भानुदास महाराज राजळे यांच्या प्रेरणेने व देवगड संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने चालत आलेला धर्मनाथ बीज उत्सव यंदाही कोवीड संदर्भातील शासकिय नियम पाळून धर्मनाथ बीज उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
. उत्सवांचे हे २४ वर्षे आहे. नवनाथ बाबा देवस्थानचे दोन भव्य दिव्य प्रसन्न मंदिर आहेत. भायगावात तर दुसरे मंदिर गावालगतच शेकडे वस्ती जवळ शेवगाव नेवासा राजमार्ग लगत आहे. भायगावचे ग्रामदैवत म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या देवस्थानला पंचक्रोशीतील भाविक श्रध्देने या ठिकाणी येतात. धर्मनाथ बीज उत्सवात संपुर्ण गावात उत्साहाचे स्वरूप पहावयास मिळते. यवर्षी बुधवार २६ / ०१ / २०२२ ते मंगळवार दि. ०१ / ०२ / २०२२पर्यत नवनाथ ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. व बुधवार दि.० २/ ०२ / २०२२ रोजी सकाळी ९ ते ११ अखंड भारतीय महाराष्ट्र राज्य संत परिषदेचे अध्यक्ष व इंदुवासीनी देवी गणेशानंदगड पिपळनेर संस्थानचे ह.भ.प. स्वामी त्रिवेंदानंद सरस्वती महाराज यांचे हरि किर्तन होईल. त्यानंतर शिवाजी उत्तम शिंदे, अशोक बाबुराव गांवडे, कडुबाळ पंढरीनाथ शेकडे, चंद्रभान सुर्यभान शेकडे, यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
भायगावमधील नवनाथ मंदिरासमोर गेल्या काही वर्षापुर्वी भाजपाचे जेष्ठ नेते, अहमदनगर दाक्षिण चे खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या स्थानिक निधीतुन अतिशय सुंदर असा सभामंडप बांधण्यात आला. तसा सभामंडप राजमार्गावरील मंदिरासमोर व्हावा. अशी ग्रामस्थासह परिसरातील भविकांची इच्छा आहे. तशा पध्दतीचा १६ ते १७ लाख रुपये खर्चाचा भव्य असा सभामंडप लोकवर्गणीतुन उभा रहात आहे. यासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.