अकोलेकरांचे प्रेम कधीही विसरू शकणार नाही-मिथुन घुगे,आठवणींना उजाळा देतांना घुगे झाले भावुक
अकोलेकरांचे प्रेम कधीही विसरू शकणार नाही-मिथुन घुगे,आठवणींना उजाळा देतांना घुगे झाले भावुक
अकोले (प्रतिनिधी) – गेल्या 22 महिन्यांच्या सेवेत अकोले सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह जनतेने जे प्रेम दिले ते कदापीही विसरू शकणार नाही असे सांगत अनेक आठवणींना उजाळा देतांना सहा.पोलिस निरीक्षक मिथुन घुगे हे भावुक झाल्याचे चित्र त्यांच्या सदिच्छा समारंभात पहावयास मिळाले.
अकोले पोलीस ठाण्याचे अधिकारी मिथुन घुगे यांची नुकतीच मुंबई येथे बदली झाली.त्याबद्दल अकोले तालुका पोलीस पाटील संघटना, नगरपंचायत, पत्रकार, सर्व शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर,पदाधिकारी यांच्या वतीने मिथुन घुगे यांचा सदिच्छा व नव्याने अकोले पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून आलेले सुभाष भोये यांचा स्वागत समारंभ पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी आपल्या 22 महिन्यातील आठवणी सांगतांना घुगे यांना अश्रू अनावर झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सतिश थेटे होते.सभागृह पूर्ण क्षमतेने भरून बाहेर लोक उपस्थित होते. व्यासपीठावर नेते व अधिकारी यांची उपस्थिती असणारा सुखद प्रसंग फार थोड्या अधिकाऱ्यांच्या वाट्याला येत असल्याची भावना यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी बोलतांना मिथुन घुगे म्हणाले कि ,अकोलेत आल्यावर प्रथम माझ्यापुढे आव्हान होते ते पोलिस स्टेशनची प्रतिमा सुधारविण्याचे .अवघी 35 कर्मचाऱ्यांची संख्या 50 वर वाढवून घेतली.माझ्या कार्यकाळात शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. शेत मालाची चोरी, व्यापारीकडुन फसवणूक असे अनेक प्रकार वाढलेले असताना मी शेतकऱ्यांच्या, टरबुज,कांदे,कोबीचे पैश्याची फसवणुकीचे गुन्हे दाखल करुन आरोपीना अटक करून 40 ते 50 लाख रूपये शेतकऱ्यांना मिळवून दिले.
भाऊकीचे,बांधावरचे भांडणे दोघांचे म्हणने एैकुण घेऊन तक्रार दाखल न करता सामंजस्याने मिटवण्याचे काम केले .या काळात अगस्ती कारखाना, नगरपंचायत,व ग्रामपंचायत अश्या संवेदनशील निवडणूका शांतते झाल्या तसेच चळवळीचा तालुका असल्याने आंदोलने मोर्चे झाले यात कुठलीही एन.सी.दाखल न करता शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले. आंदोलक व संबंधित विभागात समन्वय ठेवून काम केले. कामाचा घेतलेला वसा यापुढेही कायम राहिल असा विश्वास घुगे यांनी बोलून दाखविला.
अध्यक्षीय भाषणात बोलताना तहसीलदार सतिश थेटे यांनी 22 महिन्याच्या अकोलतील कार्यात घुगे यांच्यातील कार्यकर्ता लपून राहिला नाही असे सांगितले.कधी कीर्तनाला, गणपतीच्या आरतीला, कधी संदल मिरवणुकीत, तर कधी शालेय-महाविद्यालयीन कार्यक्रमाला त्यांची आवर्जुन उपस्थिती असत. त्यांच्या कार्यकालात एक शब्दही त्यांच्या बद्दल नकारात्मक कुणाकडूनही एैकायला मिळाला नाही असे प्रशंसनीय व दिशादर्शक काम त्यानी केले .त्यामुळेच आज तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रातील नागरीक त्यांच्या या समारंभास उपस्थीत आहे यावरून अकोले तालुकाच त्यांना निरोप देण्यासाठी एकत्र आल्याची जाणीव होत असल्याचे मत श्री थेटे यांनी व्यक्त केले.
यावेळी नुतन पो. नि. सुभास भोये म्हणाले कि- आज घुगे यांचा नावलौकिक,कार्यगाैरव एैकुण असे वाटते आपणही असेच काम करायला हवे, त्यामुळे तुम्ही घुगे यांना जसे सहकार्य केले तसेच मलाही करा, मीही त्यांच्या सारखेच काम करण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
यावेळी नगरपंचायतचे माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक,ग्रामसुरक्षा यंत्रणेचे डी के गोर्डे,पोलीस पाटील संघटनेचे शिवाजी फापाळे,अगस्ति कारखाण्याचे संचालक विक्रम नवले,आर पी आय चे शांताराम संगारे,माजी उपसभापती मारुती मेंगाळ,रुंभोडीचे सरपंच रवी मालुंजकर,ह.भ.प.दिपक महाराज देशमुख,नगराध्यक्षा साै सोनालीताई नाईकवाडी,भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे,महिलाध्यक्षा रेश्मा गोडसे,ज्येष्ठ पत्रकार शांताराम गजे,ज्येष्ठ नेते ॲड.वसंतराव मनकर,पोपटराव दराडे,
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय वाकचाैरे,मुख्याधिकारी विक्रम जगदाळे,पंचायत समिती गटविकास अधिकारी राहुल शेळके ,महावितरणचे अभियंता ज्ञानेश बागुल, तालुका कृषी अधिकारी माधवराव हासे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र वाकचौरे, आदींनी घुगे यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश झोत टाकणारी भाषणे केली.
सुत्रसंचालन पत्रकार अमोल वैद्य यांनी केले तर आभार वाशरेचे पोलिस पाटील सतिश वाकचाैरे यांनी मानले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॅा.श्यामकांत शेटे, वन परिक्षेत्र अधिकारी प्रदिप कदम,पं. स. सार्व. बांध. विभागाचे उपअभियंता दिनकर बंड,सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे,युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, अगस्ति कारखाना संचालक कैलासराव शेळके,,सचिन दराडे, विकासराव शेटे, उद्योजक राजेश गोडसे, पत्रकार सुनिल गिते,गणेश आवारी,अण्णा चौधरी,अमोल शिर्के,राजेंद्र जाधव,अल्ताप शेख,सचिन खरात,प्रवीण देठे,माजी पं. स. सद्गस्य अरुण शेळके, नगरसेवक शरद नवले,प्रदिपराज नाईकवाडी, नवनाथ शेटे,आरीफ शेख,मोहसिन शेख, हभप विश्वनाथ महाराज शेटे,आर पी आय चे राजेंद्र गवांदे, अमोल नाईकवाडी,अमित नाईकवाडी,भाऊसाहेब रक्टे,भास्कर दराडे, नानासाहेब दळवी,किरण गजे,मच्छिन्नद्र आवारी, प्रा.नामदेव चौधरी, सेनेचे शहराध्यक्ष गणेश कानवडे, अनिल कोळपकर,प्रशांत धुमाळ,नारायण डोंगरे,विलास मुतडक,अनिल देशमुख ,रोहिदास ढोन्नर महेश माळवे,उत्तम शेणकर, राहुल मंडलिक,उपनिरीक्षक भूषण हंडोरे,आदि मान्यवर उपस्थित होते.