‘प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी पयोजना’! अभ्यासक्रमाच्या गरजेनुसार शैक्षणिक कर्ज उपलब्ध – नाशिककर

.
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन
आणि पद्मशाली फौंडेशन संयुक्तपणे उपक्रम
सोलापूर : चार लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठीयाअर्ज केलात, तर हे कर्ज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांसोबत मिळू शकतं आणि यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा (जामीन) देण्याची गरज पडत नाही. सरकारने ‘प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना’ सुरू केली आहे. ही योजना फक्त विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना (Scheme For Students) असणार आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना पोर्टलच्या माध्यमातून राष्ट्रीय बँकांकडून अनेक प्रकारचे कर्ज घेता येणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्राच्या 10 हून अधिक मंत्रालये आणि विभागांच्या शिष्यवृत्ती योजनेतून पैसे दिले जातात. यामध्ये शिष्यवृत्ती योजना आणि कर्ज योजना (Scholarship And Loan Scheme For Student) एकाच व्यासपीठावर आणल्या आहेत. या योजनेत विद्यार्थ्यांच्या अभ्यास अभ्यासक्रमाच्या गरजेनुसार शैक्षणिक कर्ज (एज्युकेशन लोन) उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशीककर यांनी दिले आहे.
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी पूर्व भागातील दाजी पेठेतील श्रीराम मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्याला ४ लाख ते ६.५० लाख रुपयांदरम्यान शैक्षणिक कर्जाची आवश्यकता असेल तर, तिसऱ्या व्यक्तीची जामीन (सुरक्षा) द्यावी लागेल. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याची कर्जाची रक्कम साडेसहा लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँक मालमत्ता तारण मागू शकते. या पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाशी संबंधित प्रश्न आणि तक्रारींसाठीही ईमेलची सुविधा उपलब्ध आहे. आर्थिक दुर्बल घटकातून आला असाल तर सरकारी बँकेकडून कर्ज घ्या. यामध्ये विद्यार्थ्याला व्याज अनुदानाच्या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. कारण कर्जाची परतफेड वेळेत न झाल्यास तुमच्यासह बँकेचे कर्ज बुडविणाऱ्यांच्या यादीत तुमचे पालकही येतील. कर्जाची रक्कम प्रत्येक सेमिस्टरच्या सुरुवातीला थेट आपल्या कॉलेज किंवा विद्यापीठापर्यंत पोहोचते. कॉलेज/विद्यापीठाचा सर्व खर्च यात होतो, हे लक्षात ठेवावे लागेल. बँकेंच्या कर्जासंबंधी काही तक्रार असल्यास थेट फोन करण्याचे (9420263322) नाशीककर यांनी आवाहन केले. शैक्षणिक कर्ज (एज्युकेशन लोन) माहितीसाठी (9373182010 दयानंद कोंडाबत्तीनी)(9373182010 सुकुमार सिध्दम) यांच्याशी संपर्क करावेत.

माहिती, मार्गदर्शन घेण्यासाठी सर्वच समाजातील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांचे निवारण नाशीककर यांनी केले. यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तर, पद्मशाली फौंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल यांनी प्रास्ताविक करुन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले, शेवटी फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा यांनी आभार मानले.