इतर

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी लोकसभेची उमेदवारी करावी – बाळासाहेब काळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी

     सहकाराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणारे व ग्रामीण विकासाला महत्व देणारे व्यक्तीमत्त्व म्हणून ज्यांची जिल्ह्याभरात ओळख आहे. असे शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाला खचून न जाता. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मधून प्रतिनिधित्व करावे असे परखड मत कामधेनू पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
    ग्रामीण भागातील शेती, सहकार, पाणी, आरोग्य या व अशा आनेक विषयांवर नेहमीच प्राधान्याने लोकहिताची भुमिका मांडणारे घुले यांना जिल्हाभरात सामान्य शेतकरी वर्गातून बळ मिळेल. यासाठी तशा सुचना कार्यकर्त्याना आता देण्याची हि वेळ आली आहे. पद असो वा नसो नेहमीच  सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहुन काम करणाऱ्या नेत्याला बळ मिळालेच पहिजे विकासाच्या जोरावर यश मिळवता येईल. त्यासाठी कार्यकर्त्यांना संभ्रमात न ठेवता लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी जिल्हाभरात सहकाराच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार निर्मितीचे केलेले महान काम व विकास या गोष्टीवर भविष्यात तील लोकसभेची निवडणूक निश्चित घुलेना राजकिय बळ देणारी ठरणार आहे.असेही पत्रकात पुढे म्हटले आहे.


सामान्य शेतकरी ते नोकरदार अशा सर्वांनाच ज्या नेत्या विषयी आपुलकी व आदर वाटतो. अशा नेत्यांना राजकीय क्षेत्रात सामान्यांच्या हितासाठी लोकसभेची उमेदवारी करावी.सामान्य कष्टकरी शेतमजूरसाठी नेहमीच घुले कुटुंबीयांनी सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले आहे.अशा नेत्यांनी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पराभवात खचून न जाता पुन्हा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी व सामान्यांच्या हितासाठी लोकसभेची उमेदवारी करावी व लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांनी जायकवाडीतील विस्थापित झालेल्या अनेक कुटुंबांना आधार देण्याचे काम केले तेच काम घुले कुटुंब आजही करत असल्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचाल त्यांची यशोदायी ठरणार आहे.

शंकरराव नारळकर
माजी सरपंच भातकुडगाव
धरणग्रस्त कृती समिती शेवगाव तालुका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button