इतर

नवीन शेती तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एकरी उत्पादन वाढ शक्य – डॉ. कौशिक

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे उपविभाग स्तरीय प्रशिक्षण वर्ग संपन्न

नेवासाशेतीमध्ये उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञान व नवनवीन यशस्वी प्रयोगांचा अवलंब शेतीत केल्यास एकरी नफा व उत्पादन वाढीस मदत होते असे प्रतिपादन डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केले. . श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली च्या ९५ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित ३ दिवसीय तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतातील कृषि क्षेत्रातील सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा दिनांक १६ जुलै हा दिवस प्रत्येक वर्षी स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात्त येतो. या वर्षी दिनांक १६ ते १८ जुलै २०२३ दरम्यान तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात येत आहे. या तंत्रज्ञान दिवसाच्या समारोप दि. १८ जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी, श्रीरामपूर यांचे अधिनस्त राहुरी, श्रीरामपूर, नेवासा व शेवगाव या चार तालुक्यातील कृषि सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. श्री नारायण निबे यांनी आपत्कालीन पिक नियोजन याबद्दल तर विविध खरीप पिकांवरील किडी व रोगांचे व्यवस्थापन याबद्दल श्री माणिक लाखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी, श्रीरामपूर श्री अमोल काळे हेही उपस्थित होते, त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. क्षेत्रीय कर्मचारी व अधिकारी यांनी प्रशिक्षणातून प्राप्त ज्ञानाचा वापर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी करावा असे नमूद केले. सर्व प्रशिक्षणार्थीना केव्हीके दहिगाव- ने प्रक्षेत्रावरील विविध तंत्रज्ञान प्रात्यक्षिके जसे बी.बी.एफ. द्वारे पेरणी केलेले सोयाबीन व बेड वरती तूर, बी.बी.एफ. द्वारे पेरणी केलेले तूर व मुग आंतरपीक, ब्रीडर फुले ०२६५ ऊस प्लॉट, बी.बी.एफ. द्वारे पेरणी केलेले सोयाबीन फुले दुर्वा, गोदावरी तूर बियाणे प्लॉट, पोषण बाग व कृषि प्रदर्शन दाखविण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी राहुरी श्री अशोक गिरगुणे, तालुका कृषि अधिकारी श्रीरामपूर श्री अविनाश चंदन, तालुका कृषि अधिकारी नेवासा श्री धनंजय हिरवे हे उपस्थित होते. तीन दिवसीय तंत्रज्ञान दिवसाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी केव्हीके दहिगाव – ने चे श्री सचिन बडधे, श्री नंदकिशोर दहातोंडे, इंजी. राहुल पाटील, डॉ चंद्रशेखर गवळी, श्री प्रकाश हिंगे, श्री प्रकाश बहिरट यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button