पारनेर तालुक्यात आरोग्य केंद्र बळकट करा- शरद पवळे

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
ग्रामीण भागातील अनेकजण आर्थिक विवंचना, भितीपोटी विविध व्याधींनी ग्रस्त असणार्या सर्वसामान्य नागरिकांसाठी पारनेर तालुक्यातील आरोग्य केंद्र उपकेंद्र वरदान ठरत आहेत. परंतु या आरोग्य केंद्रांत प्रथमोपचारासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू,आरोग्य तपासणी यंत्रसामग्री,याचा तुटवडा आहे.या आरोग्य केंद्रांत आवश्यक ते साहित्य व यंत्रणा सक्षम करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केली आहे
प्रत्येक केंद्रात,स्टेथोस्कोप,बीपी ऑपरेटस,इलेक्ट्रिक निडल कटर,डिजिटल काटा आदी वस्तू आवश्यक,असतात परंतु अनेक ठिकाणी त्या नादुरुस्त झाल्या आहेत केंद्रात शिवाय विविध उपचारांची औषधे उपलब्ध नाहीत त्यामुळे या गंभीर बाबींचा विचार करून पारनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रांना उपचारासाठी आवश्यक सामग्री औषध साठा उपलब्ध करून तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे
ग्रामीण भागातील नागरीकांच्या निरोगी जिवणासाठी शासनाने मोठा खर्च करून ग्रामीण भागात उभारलेली प्राथमिक केंद्र उपकेंद्रे व्याधीग्रस्थांसाठी आरोग्यमंदिरे भविष्यात निरोगी जीवनासाठी वरदान ठरतील यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.