मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी ५० कोटी च्या विकास कामांना मंजूरी – आमदार मोनिका राजळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी पुरवणी अर्थसंकल्प ऑगस्ट २०२२ मध्ये रु. ५० कोटी ३० लाख किंमतीच्या कामांना मंजूरी मिळालेली आहे. या कामामध्ये राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.
शेवगांव-पाथर्डी तालुक्यातील वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग सन २०२१ मधील अतिवृष्टी व महापुरामुळे अत्यंत खराब व वाहतूकीसाठी धोकेदायक झाल्याने या रस्त्यांची पुन:बांधणी तसेच आतिवृष्टीने जीर्ण झालेल्या रस्त्यांची मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे.
मागील दोन वर्ष रस्त्यांच्या कामांना अर्थसंकल्पात तरतूद झाली नसल्याने रस्त्यांची कामे होवू शकली नव्हती. परंतू आता मंजूर झालेल्या निधी मधून मोठया प्रमाणात रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे कामे होतील. तसेच उर्वरीत राहिलेल्या कामांना निधी मिळणेसाठी मी प्रयत्नशिल आहे.
या मंजूर रु. ५० कोटी ३० लाख किंमतीच्या कामामध्ये मिरी -शेवगांव रस्त्यासाठी रु. ५ कोटी ५५ लाख, तिसगांव-शेवगांव रस्त्यासाठी रु. ४ कोटी ७० लाख, शेवगांव-गेवराई रस्त्यासाठी रु. ६ कोटी २५ लाख, नेवासा-शेवगांव-गेवराई रस्त्यासाठी रु. ६ कोटी २५ लाख, बाभुळगांव-गदेवाडी-मुंगी रस्त्यासाठी रु. २ कोटी, ढोरजळगांव-आव्हाणे-अमरापुर रस्त्यासाठी रु. २ कोटी २५ लाख, कोरडगांव-बोधेगांव रस्त्यासाठी रु. ३ कोटी, वरुर-सुसरे-पागोरीपिंपळगांव-आगसखांड रस्त्यासाठी रु. १ कोटी ५० लाख, कोरडगांव-जिरेवाडी-नांदूरनिंबादैत्य-भगवानगड रस्ता यासाठी रु. १२ कोटी, रामा-२२२ ते पागोरी पिंपळगांव-साकेगांव-पाडळी रस्त्यासाठी रु. २ कोटी ५० लाख, चिंचपुर इजदे-पिंपळगांव टप्पा-जोगेवाडी रस्त्यासाठी रु. ३ कोटी ५० लक्ष किंमतीच्या कामांना मंजूरी मिळालेली आहे.
या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामांना एवढया मोठया प्रमाणात निधी दिल्यामुळे आमदार राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले.