राज्यस्तरीय काव्य महोत्सव संपन्न

संगमनेर प्रतिनीधी
संगमनेर साहित्य, कला व सांस्कृतिक संघ आयोजित राज्यस्तरीय काव्य महोत्सव २०२५ चे आयोजन रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले होते. व्यासपीठावर पाठ्यपुस्तकातील ज्येष्ठ लेखक/ कवी शशिकांत शिंदे,साहित्यिक सुभाष सोनवणे, प्रतीथयश व्यापारी अण्णासाहेब नवले, प्रमुख सल्लागार लेखिका नीलिमा क्षत्रिय, विश्वस्त रवींद्र गुंजाळ, व्यापारी मनसुखशेठ भंडारी, संघाचे अध्यक्ष रमेश शिंदे,कार्याध्यक्ष डॉ.विवेक वाकचौरे, सचिव राजाभाऊ भांडगे, उपाध्यक्षा वंदना बाचकर, कोषाध्यक्ष नितीन कोळपकर, नीलिमा दिघे, योगिता पिसाळ, संदीप खांबेकर, डॉ. कोमल दाभाडे,सागर साठे, कैलास वाघमारे, दर्शन जोशी, लतिका सोनी, दीपकशेठ टाक, संजय शेलार, डॉ. नीलिमा निघुते,अंतून घोडके, नाना गुजराती, इतर मान्यवर आणि पदाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.
ज्येष्ठ कवी शशिकांत शिंदे, व्याख्याते सुभाष सोनवणे यांनी आपल्या प्रभावी शैलीने आणि कवितेच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करून आयोजकांचे कौतुक केले.असे कार्यक्रम सतत घेतले जावेत, त्यामुळे लेखक ,कवी यांच्या विचारांना चालना मिळते आणि त्यांच्या हातून चांगल्या साहित्याची निर्मिती होते अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.
संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, मा. आमदार विधान परिषद सुधीरजी तांबेसाहेब यांनी काव्य महोत्सवाला धावती भेट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संघाचे आभार मानून कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ४७ कवींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. प्रत्येक कवीच्या तीन काव्यरचना घेण्यात आल्या. याप्रसंगी दिवसभर चालणाऱ्या काव्य महोत्सवासाठी मोठ्या संख्येने काव्यप्रेमी व काव्य रसिक आणि संगमनेर साहित्य, कला व सांस्कृतिक संघाचे सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अनेक कवींच्या दर्जेदार कवितांचा मनमुराद आस्वाद रसिकांना घेता आला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचलन लेखक विचारवंत संदीप वाकचौरे सर यांनी केले. प्रास्ताविक रमेश शिंदे सर, काव्य वाचनाची नियमावली डॉक्टर विवेक वाकचौरे, पाहुण्यांचा परिचय वंदना बाचकर, राजाभाऊ भांडगे, नीलिमा दिघे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार अध्यक्ष रमेश शिंदे सर यांनी मानून शेवटी योगिता पिसाळ यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम देखणा आणि यशस्वी होण्यासाठी संगमनेर साहित्य, कला व सांस्कृतिक संघाच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी खूप मेहनत घेतली,त्याबद्दल त्यांचे विशेष आभार व धन्यवाद!.