एक दिवस स्वप्ननातला – रोटरी क्लब ऑफ नासिकचा अनोखा उपक्रम

नाशिक प्रतिनिधी
रोटरीचे ब्रीदवाक्य “सर्विस अबावू सेल्फ ” ( स्वतः कडे न बघता दुसऱ्यांची सेवा करणे) आहे, हे लक्षात ठेवूनच रोटरी क्लब ऑफ नासिकने हाती घेतलेले सर्व प्रकल्प पूर्ण केले आहेत
मात्र या सगळ्यात कधी कधी आपण लहान मुलांना विसरतो. विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना दैनंदिन आव्हानांना तोंड देणे फार कठीण असते. जगण्याशिवाय इतर कशाचाही विचार करायला त्यांच्याकडे वेळ नाही.रोटरी क्लब ऑफ नासिक ने हे बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आयुष्यातला एक दिवस “स्वप्नातला दिवस” बनवायचा ठरवला एकदा ध्येय निश्चित केले की मागे वळून पाहायचे नाही, या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी प्रायोजक, वक्ते, स्वयंसेवक पुढे आले.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षण देणारी उन्नती शाळेची निवड करण्यात आली. हॉटेल BLVD च्या मालकांनी दिवस प्रायोजित केला. काही रोटेरियन्सनी प्रायोजित वस्तू आणि फ्रावशी इंटरनॅशनल अकादमीच्या इंटरॅक्टर्सने त्यांच्या सेवा स्वेच्छेने दिल्या. उन्नती शाळेतील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी फ्रावशी इंटरनॅशनल अकादमीने स्कूल बसेस उपलब्ध करून दिल्या. अनेक रोटेरियन लोकांनी मुलांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. दोन सुप्रसिद्ध वक्त्यांनी मुलांशी (प्रो- बोनो) संवाद साधण्याचे स्वीकारले
हा प्रकल्प १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता निश्चित करण्यात आला
उन्नती शाळेतून २ बस ७२ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना घेऊन निघाल्या आणि “स्वप्नातला दिवस” सुरु झाला.
हॉटेलच्या मोठ्या हॉलमध्ये आल्यानंतर इंटरॅक्टर्सनी हँडवॉशचे (हात धुण्याची) शास्त्रोक्त पद्धत दाखवली. ह्यानंतर पोटभर नाष्टा झाला. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांना हॉटेलच्या कामकाजाचे स्पष्टीकरण आणि प्रात्यक्षिक करून दाखवले.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री प्रथमेश रहाळकर यांनी आपल्या कलाकृतींचे प्रात्यक्षिक सादर केले. मिळालेल्या टिप्समधून विद्यार्थ्यांनीही आपल्या मित्रांची व्यंगचित्रे रेखाटून सहभाग घेतला.
दुपारच्या जेवणानंतर श्री सुनील चांडक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजक बनण्याचे महत्त्व समजावून सांगितले.
आमच्या अध्यक्षा, Rtn डॉ. श्रिया कुलकर्णी यांच्यासह Rtn लक्ष्मण वाघ, PP Rtn मनीष चिंधडे, PE Rtn प्रफुल्ल बर्डिया आणि Rtn डॉ रचना चिंधडे यांनी देखील विद्यार्थ्यांना जीवन कसे जगायचे, जीवनात पुढे कसे जायचे आणि निरोगी जीवन कसे जगावे याच्या टिप्स देऊन संवाद साधला.
शेवटी विद्यार्थी, शिक्षक, रोटेरियन, इंटरॅक्टर्स असे सगळ्यांनीच २ मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. क्लबचे बरेच सदस्य थोडा वेळ घालवण्यासाठी आले.
FIA च्या इंटरॅक्टर्सनि उत्तम जबाबदारी सांभाळून कार्यक्रमात काहीही कमी पडू नये ह्याची खबरदारी घेतली दुपारचा नाश्ता आणि चहा झाल्यावर हे स्वप्न पूर्ण झालं. बसमध्ये चढून शाळेत परतत असताना, या तरुण मुला-मुलींच्या डोळ्यातले तेज आणि चमक आम्हा सर्वांना दिसत होती. प्रत्येक विद्यार्थ्याला क्लबच्या सदस्यांकडून पार्टिंग गिफ्ट म्हणून एक बॅग भरून वस्तू देण्यात आल्या.
उन्नती शाळेतील काही विद्यार्थ्यांनाही स्टेज वर येवून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ह्या कार्यक्रमाने त्या ना नक्कीच मागदर्शन मिळाले आहे असेही ते म्हणाले. उन्नती शाळेने देखील रोटरी क्लब ऑफ नासिकला पत्र देऊन या अनोख्या उपक्रमाचे आभार मानले आहेत.
ही “स्वप्नातला दिवस” संकल्पना क्लबने जवळपास पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा राबवली होती. हा प्रकल्प अर्थातच कोविडमुळे दोन वर्षांसाठी स्थगित झाला. पण या वर्षी त्याचे पुनरुज्जीवन झाल्याचे पाहून प्रत्येकाला खूप आनंद झाला. भविष्यातही हे असेच चालू राहील अशी आशा आहे!!