येवला तालुक्यातील गोर – गरिबांना 100% कोठ्या प्रमाणे, धान्य, पुरवठा केव्हा मिळणार ?

डॉ. शेरूभाई मोमीन,
येवला/नाशिक
नाशिक जिल्ह्यातील येवला शहर व तालुक्यातील वंचित नागरिकांना, मोलमजुरी करणारे सर्व खरे वंचित घटक यांना केंद्र व राज्य शासनाने त्वरित राष्ट्रीय अन्न – सुरक्षा योजनेअंतर्गत 100% कोठा वाढवून द्यावा
धान्य प्रमाणे पवित्र, माहे, रमजान, डॉ. आंबेडकर जयंती, दि. 14 एप्रिल, गुढीपाडवा, या सर्व सणाच्या निमित्ताने जास्तीत जास्त किराणा वस्तूंचा कोठा, वाढवून शासनाने त्वरित गोर – गरिबांवर दया करावी अनेक नागरिकांना गेल्या सात ते आठ वर्षांपासून धान्य पुरवठा होत नाही अशा वंचित घटकांना केशरी रेशन कार्डधारकांना शंभर टक्के कोठा वाटप करून , न्याय द्यावा, दारिद्र – रेषेखालील खऱ्या गरजूंचा त्वरित सर्वेक्षण करण्यात यावा, होणारा भ्रष्टाचार काळा बाजार बंद करून , भारतीय संविधान कायद्या नुसार, , सर्वच, ग्राहकांना रीतसर, पावती देण्यासाठी आदेश द्यावेत, असे निवेदन, स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, अल्पसंख्यांक विकास मंडळ, यांच्या वतीने, पालकमंत्री ना. दादाजी भुसे, व.जिल्हाधिकारी कार्या. नाशिक, यांना दिले आहे
निवेदनावर, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा, नाशिक जिल्हाध्यक्ष श्री.डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, राशीद समद शेख, गफ्फार अन्सारी, समीर सैय्यद, अरबाज मोमीन, हुसेन अन्सारी, संजय संत, अरबाज कुरेशी, तौसिफ़ शेख, सोमनाथ रोकडे, धर्मराज अलगट, कचरू जानराव, नाना जानराव, जाहीद असलम शेख, आदम मोमीन, अकरम असलम शेख, मोबीन मुलतानी, आश्रफ मोमीन, अल्ताफ पठाण, अजय राजपूत, जगदीश गुजर, ओम राजपूत, नर्गिस शेख, आदी सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.