गुरुदत्त भक्तीधाम मध्ये किसनगिरी बाबा पुण्यतिथी संपन्न

दत्ता ठुबे
नगर – दत्तात्रय भगवान व किसंगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य भास्करगिरी महाराज,श्री क्षेत्र देवगड देवस्थान यांच्या प्रेरणेने पाईपलाईन रोड येथील संत किसनगिरी नगर येथे गुरुदत्त भक्तीधाम मध्ये श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा यांची पुण्यतिथी सोहळा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दत्त अभिषेक,नित्य, पूजा व आरती करण्यात आली.
सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री किसनगिरी विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले.दुपारी १२ वाजता महाआरती करण्यातआली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. महाआरती नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी भक्तमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.रात्री ९ ते ११ या वेळेत हभप गोरक्षनाथ दुतारे महाराज यांचा भजन संध्याचा कार्यक्रम झाला.दत्त गुरुंच्या भजनांनी मंदिर परिसर दुमदुमला.मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या पुण्यतिथी सोहळ्यास कार्यक्रमास भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके,युवा नेते अक्षय कर्डिले,जालिंदर बोरुडे. मर्चंट बॅंकेचे व्हा.चेअरमन अमित मुथा,नगरसेविका मीनाताई चव्हाण यांचा नगर भक्तमंडळ कडून सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाच्या सेवकांनी परिश्रम घेतले.
फोटो-नगरमधील पाईपलाईन रोड येथील संत किसनगिरी नगर येथे गुरुदत्त भक्तीधाम मध्ये श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा यांची पुण्यतिथी सोहळा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.