पूना हॉस्पिटलवर रुग्ण हक्क परिषदेचे हल्लाबोलआंदोलन !

पुणे – पूना हॉस्पिटचा धिक्कार असो, पूना हॉस्पिटलचं करायचं काय – खाली डोकं वर पाय, रुग्ण हक्क परिषदेचा विजय असो! पूना हॉस्पिटलच्या प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करीत आज रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने आज पूना हॉस्पिटल समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले. आंदोलनास रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा साठ्ये – मारणे, पुणे शहर कार्याध्यक्ष नितीन चाफळकर, उपाध्यक्ष यशवंत भोसले, संघटक कविताताई डाडर, रुग्ण हक्क परिषदेचे सल्लागार अनिल गायकवाड, दत्तात्रय पाकीरे, तुळशीदास तांबे, पुणे शहर समन्वयक विजय लांडे, परिषदेचे मंत्रालयीन कामकाज समितीचे विजय रणदिवे, पर्वती विभाग उपाध्यक्ष दिलीप ओव्हाळ, लक्ष्मण थोरात, संघटक स्वप्निल जोगदंड, सचिव प्रतीक खोपडे, सहसचिव प्रभाताई अवलेलू, खडकवासला विभागाचे शैनाज शेख, नरहरी भोसले, बाळासाहेब बनसोडे, बाळासाहेब ननावरे, अशोक म्हस्के, पुणे कॅन्टोन्मेंट विभागाच्या रेश्मा ताई जांभळे सह रुग्ण हक्क परिषदेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले कि, पूना हॉस्पिटलवर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या गुटख्याला बंदी घातलेली आहे त्या माणिकचंद गुटख्याचा लोगो लावलेला आहे. माणिकचंद गुटख्याच्या माध्यमातून हजारो तरुणांना कॅन्सरच्या रोगाने ग्रस्त केलेले असताना आम्ही कॅन्सर निवारणाचे केंद्र पुन्हा हॉस्पिटलमध्ये काढले असल्याची भलावण करून रुग्णांना कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनेचा लाभ मिळवून देता, स्वतःचे घरदार किंवा दागदागिने विकून हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी भाग पाडले जाते.
रुग्णांना मोफत उपचारांचा हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेने केलेल्या आंदोलनाची आम्ही दखल घेतली आहे. यापुढे रुग्णांना शासकीय योजना व मोफत उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असे पूना हॉस्पिटल प्रशासनाचे प्रमुख महेंद्र जैन म्हणाले.
पुना हॉस्पिटल समोर रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने केलेल्या आंदोलनाला सर्वसामान्य रुग्णांनी ही मोठा प्रतिसाद दिला असून, पुना हॉस्पिटलने रुग्णांवर केलेल्या आर्थिक अन्यायाचा मोठा पाढा यावेळी वाचून दाखवला.